नर्ससोबत सेक्स करताना पकडला गेला कर्नल, आता आर्मी करणार कारवाई 

भारतीय लष्करातील कर्नल रँकच्या एका अधिकारीविरूद्ध नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने हे पाऊल एक व्हिडिओ समोर आल्यानंतर उचलले आहे.

army has initiated disciplinary proceedings against a colonel whose videos surfaced showing him in a compromising position viral video in marathi tvir 1
नर्ससोबत सेक्स करताना पकडला गेला कर्नल, आता आर्मी करावाई   |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई : भारतीय लष्करातील कर्नल रँकच्या एका अधिकारीविरूद्ध नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने हे पाऊल एक व्हिडिओ समोर आल्यानंतर उचलले आहे. व्हिडिओमध्ये हा अधिकारी आपल्या ऑफीसमध्ये महिला सहकाऱ्यासोबत सेक्स करताना दिसत आहे. 

लष्करातील सूत्रांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर अधिकाऱ्याविरूद्ध उच्चस्तरीय 'कोर्ट ऑफ इनक्वायरी' सुरू केली आहे. अधिकारी पंजाबमध्ये माजी सैनिकांसाठी बनविण्यात आलेल्या क्लिनिकमध्ये एका नर्ससोबत सेक्स करताना सापडला आहे. 

अधिकाऱ्याला चौकशीनंतर जनरल कोर्ट मार्शलचा सामना करावा लागू शकतो. ही चौकशी विशेष लष्कर अधिनियमांनुसार सुरू करण्यात आली आहे. यात अधिकाऱ्यांशिवाय रिटायरमेंटनंतर माजी सैनिकांवरही कारवाई करण्यात येऊ शकते. 

भारतीय लष्कराशी संबंधीत सूत्रांनी सांगितले की, आर्मी कायद्यातील कलम १२३ नुसार अधिकारला निवृत्तीनंतर पुन्हा सेवेसाठी बोलवण्यात आलेले आहे. तसेच त्याची या प्रकरणात पंजाबमध्ये चौकशी सुरू आहे. पंजाबमध्ये अधिकारीला एक्स सर्व्हिसमन कॉन्टिब्युट्री हेल्थ स्किम पॉलिक्लिनिकमध्ये नर्ससोबत चाळे करताना पकडण्यात आले आहे. 

नवे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सर्व कमांडला लष्करात नैतिक भ्रष्टाचार आणि वित्तीय अनियमितता प्रकरणात झिरो टॉलेरन्सचे कठोर आदेश दिले आहेत. 

अधिकाऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये तेव्हा पकडण्यात आले जेव्हा या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्याच्या या चाळ्यांचा एक व्हिडिओ बनवला. जवानांनी  पुरावा म्हणून हा व्हिडिओ दिल्लीती संरक्षण मंत्रालयात पाठवला. ट्रायल प्रक्रिया दरम्यान या व्हिडिओची चौकशी होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी