इतक्या कोटी रुपयांना विकला जातो हा मासा, घरात ठेवला की येतात पैसे !

हा मासा घरात ठेवला तर घरात फक्त पैसेच येत नाही तर एकूणच घराच्या संपत्ती वाढ होते अशी मान्यता आहे. फेंग शुईप्रमाणे अॅरोवाना मासा (Arowana Fish) घरात ठेवल्याने घराची प्रगती होते, असा या परिसरातील लोकांचा समज आहे.

Arowana Fish
अॅरोवाना मासा  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • ५० दिवसांपर्यत तोंडात ठेवू शकतो हा मासा
  • २ कोटीपर्यत विकला जातो अॅरोवाना मासा
  • अॅरोवाना माशाचे खाद्य आणि माशाची ताकद

नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन (Amazon river) नदीच्या उपनद्या असलेल्या ओयापॉक आणि रुपुनुनी या नद्यांमध्ये एक खास मासा सापडतो. हा मासा गयाना या देशातदेखील सापडतो. या माशाचे नाव आहे अॅरोवाना मासा (Arowana Fish). हा मासा तुलनेने उथळ पाण्यात आणि नदीच्या दलदल असलेल्या भागात आढळतो. इतकेच नाही तर या माशाला पाण्याच्या पृष्ठभागावर यायला आवडते. या माशाची किंमत थक्क करणार (Costliest fish)आहे. कारण हा मासा घरात ठेवला तर घरात फक्त पैसेच येत नाही तर एकूणच घराच्या संपत्ती वाढ होते अशी मान्यता आहे. अॅरोवाना मासा गोड्या पाण्यातील मासा आहे. खाऱ्या पाण्यात राहण्याएवढी सहनशक्ती या माशात नसते. लोक या माशाचे घरातच प्रजननदेखील करतात. फेंग शुईप्रमाणे (Feng Shui) अॅरोवाना मासा घरात ठेवल्याने घराची प्रगती होते, असा देखील या परिसरातील लोकांचा समज आहे. (Costliest Arowana fish, it it believed that it attracts wealth)

५० दिवसांपर्यत तोंडात ठेवू शकतो हा मासा

समोर आलेल्या माहितीनुसार अॅरोवाना नर मासा आपल्या तोंडात जवळपास ५० दिवसांपर्यत अंडे ठेवू शकतो. जेव्हा या माशाची पिल्ले थोडी मोठी होतात तेव्हा हा मासा आपले तोंड उघडतो.

२ कोटी रुपयांना विकला जातो हा मासा

अॅरोवाना मासा शक्तीशाली असतो आणि अत्यंत साहसी असतो. हा मासा २० वर्षांपर्यत जगतो. याची लांबी जवळफास १२० सेंटीमीटरपर्यत वाढते. म्हणजेच जवळपास ४ फूटापर्यत. याचे वजन साधारण ५ किलोपर्यत असते. सर्वसाधारणपणे हा मासा एक कोटी रुपयांपर्यत विकला जातो. मात्र ब्लॅक मार्केटमध्ये याची किंमत २ कोटी रुपयांपर्यतदेखील पोचते.

अॅरोवाना माशाचे खाद्य आणि माशाची ताकद

अॅरोवाना मासा मांसाहारी असून तो नदीत असताना पाण्यातील किडे आणि छोटे मासे खातो. मात्र जेव्हा घरात किंवा एखाद्या तळ्यात त्याला पाळले जाते तेव्हा तो गांडूळ, छोटे मासे, झींगे, कीडे आणि बरेच काही खातो. या माशाला घरात ठेवतात तेव्हा या माशाची खूप काळजी घ्यावी लागते. एरोवाना मासा तसा शक्तिशाली असतो. हा मासा जबरदस्त उडी मारू शकतो. पाण्यापासून ५ फूट वर उंच उडी घेण्याची याची क्षमता असते. जेव्हा या माशाला घरात फिशटॅंक किंवा अक्वेरियममध्ये ठेवतात तेव्हा त्याची किती काळजी घ्यावी लागत असेल याची कल्पना करावी. दक्षिण अमेरिकेबरोबरच दक्षिण आशियातदेखील अॅरोवाना मासा काही ठिकाणी आढळतो.

दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदी ही एक आश्चर्यकारक बाबींचा समुद्रच आहे. अॅमेझॉन नदीचा विशालपणा, तेथील जंगतामधील असंख्य प्राणी, अॅनाकोंडा यासारख्या असंख्य बाबाींमुळे अॅमेझॉनची जगभर ख्याती आहे. अॅमेझॉन नदीच्या काठावर असणाऱ्या गावांचा एरवी जगाशी अजिबात संपर्क नसतो. नदीला पूर आल्यावर तर आजूबाजूचा कित्येक किलोमीटरचा परिसर पाण्याखाली जातो. अॅमेझॉनच्या खोऱ्यातील नागरिकांमध्ये अनेक मान्यता आहे. त्यातील बऱ्याचशा तर आपल्याला विचित्र वाटाव्यात अशाच आहेत. अॅमेझॉनच्या खोऱ्यातील अनेक अद्भूत जीवांपैकीच एक म्हणजे अॅरावाना मासा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी