VIDEO : ट्रक चालकानं नागिनचा हॉर्न मारताच, तरुणांच्या अंगात संचारला वरतीत लोळणारा नाग; रस्त्यात जीवघेणा डान्स

शहर व परिसरात गेल्या दोन व तीन दिवसात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संततधार पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गंगापूर धरण परिसर, बॅकवॉटर, दुगारवाडी, इगतपूरी, पैन्हे यासह विविध ठिकाणी चांगलीच गर्दी होत आहे. हा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तरुण मजा मस्ती करतात. परंतु आनंद घेणं दुसऱ्यांच्या आणि स्वता: च्या जिवाला घातक ठरू शकतो. असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे. त्र्यंबकेशवर भागात भररस्त्यात डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

youth nagin dance on road
ट्रक चालकानं नागिनचा हॉर्न ऐकताच तरुणांनी सुरू केला डान्स  |  फोटो सौजन्य: Twitter

नाशिक : शहर व परिसरात गेल्या दोन व तीन दिवसात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संततधार पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गंगापूर धरण परिसर, बॅकवॉटर, दुगारवाडी, इगतपूरी, पैन्हे यासह विविध ठिकाणी चांगलीच गर्दी होत आहे. हा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तरुण मजा मस्ती करतात. परंतु आनंद घेणं दुसऱ्यांच्या आणि स्वता: च्या जिवाला घातक ठरू शकतो. असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे. त्र्यंबकेशवर भागात भररस्त्यात डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल त्याशिवाय वाहतुकीत अडथळा करत असल्यानं त्यांच्यावर राग देखील येईल. 

नाशिकमधील त्र्यंबकेशवर भागात काही युवकांनी भर रस्त्यात ट्रक समोर नाचून ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर ठेका धरला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या युवकांनी मद्य प्राशन केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर झोपून तरुणांनी दंगामस्ती केली. या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, रहदारीच्या रस्त्यावर अशाप्रकारे डान्स केला जात असताना पोलिसांसह जिल्हा प्रशासनाकडून असे प्रकार रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याने या निमित्ताने उघड झाले आहे.

मात्र, आपल्या या आनंदामुळे एखाद्या व्यक्तीला इजा होऊ शकते किंवा जीव धोक्यात येऊ शकतो याची पुसटशी कल्पनादेखील त्यांच्या मनात आली नाही. पर्यटकांनी अशा प्रकारे हुल्लडबाजी करणे हे निंदनीय आहे. यावर तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी