पाच जणांनी केले मुलीचे शारीरिक शोषण, व्हिडीओ व्हायरल

एका मुलीचे पाच जणांनी शारीरिक शोषण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचे फोटो आसाम पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत.

A video of a young girl being brutally tortured by five men gone viral Assam Police released images of 5 suspected culprits
पाच जणांनी केले मुलीचे शारीरिक शोषण, व्हिडीओ व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • पाच जणांनी केले मुलीचे शारीरिक शोषण, व्हिडीओ व्हायरल
  • व्हिडीओत दिसणाऱ्या पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
  • आसाम पोलिसांनी सुरू केली शोध मोहीम

नवी दिल्ली: एका मुलीचे पाच जणांनी शारीरिक शोषण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचे फोटो आसाम पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. व्हिडीओतील घटना नेमकी कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळी घडली आहे हे अद्याप समजलेले नाही. मात्र व्हिडीओतील पीडीत मुलगी इशान्य भारतातील असल्याचे चेऱ्यावरुन वाटत आहे. आसाम पोलिसांनी व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर आरोपींविरोेधात कारवाईची तयारी सुरू केली आहे. A video of a young girl being brutally tortured by five men gone viral Assam Police released images of 5 suspected culprits

पोलिसांनी चार फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो प्रसिद्ध करुन एका मुलीचे शारीरिक शोषण करणारे हेच ते पाच जण आहेत ज्यांचा शोध सुरू आहे, असे ट्वीट पोलिसांनी केले आहे. या घटनेबाबत माहिती असल्यास संपर्क साधा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देऊन मोलाची मदत करणाऱ्यास पोलिसांकडून बक्षिस दिले जाणार आहे. 

मुलीचे शारीरिक शोषण हा एक गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा करणाऱ्यांना अटक करुन न्यायालयासमोर उभे करणे आवश्यक न्यायालय त्यांना योग्य ती शिक्षा देण्यास समर्थ आहे. तेव्हा आरोपींना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यासाठी माहिती देऊन सहकार्य करा; अशा स्वरुपाचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

आरोपी मुलीला बेदम मारहाण करताना आणि तिचे कपडे काढत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी