Viral Story: अबब, पाहा आसाममध्ये सापडला किती फुटांचा किंग कोब्रा

व्हायरल झालं जी
Updated Jul 08, 2019 | 16:08 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Viral Story: आसाममधील नागौरा जिल्ह्यात १४ फूटांचा किंग कोब्रा साप सापडला आहे. घटनास्थळी साप पकडणाऱ्या तज्ज्ञांच्या टीमला पाचारण केले. चहाच्या एका मळ्यात हा साप दिसला होता. या सापाला जंगलात सोडून देण्यात आले.

King Cobra
आसाममध्ये चहाच्या मळ्यात सापडला १४ फूट किंग कोब्रा   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • आसाममध्ये चहाच्या मळ्यात सापडला किंग कोब्रा
  • चहाच्या मळ्यात कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
  • कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण करण्याची सोशल मीडियावर मागणी

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत अरुणाचल प्रदेशातील कामेंग जिल्ह्यात सापाची नवीन प्रजाती पहायला मिळाली होती. सर्पमित्रांच्या एका टीमला नारंगी लाल रंगाचा एक साप सापडला होता. जिल्ह्यातील रमदा गावाजवळ एका ग्रामस्थाने पहिल्यांदा हा साप पाहिला होता. या सापाला पकडल्यानंतर त्याची डीएनए चाचणी करण्यात आली. प्राणी आणि सर्प मित्रांच्या म्हणण्यानुसार त्या सापाच्या शारीरिक विशेषणांचा अभ्यास करण्यात आला त्यात ही सापाची नवीन प्रजाती असल्याचं स्पष्ट झालं आहे. अरुणाचल प्रदेशातील या अनोख्या सापाची वैशिष्ट्ये पाहून प्राणी मित्र हैराण झाले आहेत. आता अशीच एक घटना आसाममध्ये घडली आहे. या दोन्ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. प्राणी मित्रांचं या घटनांनी लक्ष वेधलं असून, सापाची नवी प्रजाती उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

सापाला जंगलात सोडून दिले

आसाममधील नागौरा जिल्ह्यात १४ फूट लांबीचा किंग कोब्रा साप सापडला आहे. हा साप दिसल्यानंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. त्यांना साप पकडणाऱ्या तज्ज्ञांच्या टीमला पाचारण केले. चहाच्या एका मळ्यात हा साप दिसला होता. मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनी तो पहिल्यांदा पाहिला होता. पण, पाहता क्षणी धडकी भरवणाऱ्या या कोब्रामुळं मळ्यातील कामगारांमध्ये खळबळ उडाली होती. या संदर्भात एएनआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर वृत्त आणि १४ फूट कोब्राचे फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. एएनआय न्यूज एजन्सीने ट्विटरवर लिहिले आहे की, आसाममध्ये १४ फूट लांबीचा किंग कोब्रा सापडला आहे. ही घटना ५ जुलैची असून, नागौरा जिल्ह्यातील जेजुरी चाय इस्टेटमध्ये हा साप पहिल्यांदा दिसला आहे. साप पकडणाऱ्या तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन सापाला पकडले. यानंतंर सुगाव रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये हा साप सोडून देण्यात आला.

 

कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

एएनआयच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर झालेले फोटो पाहिल्यानंतरही धडकी भरत आहे. ट्विटर युजर्सही या सापाचे फोटो पाहून चकित झाले आहेत. या फोटोवर आता कमेंट येऊ लागल्या असून, असे साप जर चहाच्या मळ्यात सापडत असतील तर, तेथील कर्माचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे. यात एकाने कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा सल्लाही दिला आहे. एका ट्विटर यूजरने म्हटले आहे की, चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अँटीडोस देण्यात यावेत. तसेचे तेथे प्राथमिक उपचारांसाठीची सर्व व्यवस्था असायला हवी. असा साप चावल्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो. एका युजरने सापाला जंगलात सोडून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Viral Story: अबब, पाहा आसाममध्ये सापडला किती फुटांचा किंग कोब्रा Description: Viral Story: आसाममधील नागौरा जिल्ह्यात १४ फूटांचा किंग कोब्रा साप सापडला आहे. घटनास्थळी साप पकडणाऱ्या तज्ज्ञांच्या टीमला पाचारण केले. चहाच्या एका मळ्यात हा साप दिसला होता. या सापाला जंगलात सोडून देण्यात आले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola