मेलबर्न : जगभरातील महिला विरूद्ध अपराधांना आळा घालण्यासाठी केलेल्या जाणाऱ्या प्रयत्नानंतरही अपराध थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. आता ऑस्ट्रेलियाने मानवतेसाठी काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. जिथे एका 40 वर्षीय व्यक्तीने सहा महिलांना लैंगिक गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून ठेवले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुरावा म्हणून अनेक फोन, कॅमेरे, संगणकही जप्त केले आहेत.
हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स येथील आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकावर महिलांना गुलाम केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेने सांगितले की आरोपीने तिच्या गळ्यात स्टीलची पट्टा लावून तिला धातूच्या पिंजऱ्यात बंदिस्त केले होते.
जेम्स रॉबर्ट डेव्हिस असे आरोपीचे नाव वर्णन केले जात आहे. बातमीनुसार त्याने न्यू साउथ वेल्सच्या ग्रामीण भागात अनेक लहान लाकडी झोपड्या बनवल्या आहेत. मुख्य इमारतीपासून काहीशे मीटर अंतरावर असलेल्या या झोपड्यामध्ये एकच बेड होते. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल रिझर्व पोलिसांनी गुरुवारी येथे छापा टाकला आणि ही कारवाई 15 तास चालली होती.
छापेमारी दरम्यान पोलिसांना सेक्स संदर्भातील अनेक वस्तू सापडल्या आहेत. डेव्हिसने महिलांची दिशाभूल केली असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने महिलांकडून अशा करारावर स्वाक्षरी करून घेतली ज्या नुसार त्या महिला स्वत: च्या इच्छेनुसार डेव्हिसला आत्मसमर्पण करीत आहे. नंतर डेव्हिसने त्याच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ केला. तसेच त्यांच्याकडून सेक्स वर्कही करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या सेक्स वर्कसाठी त्यांना पैसे दिले जात नव्हते.
पोलिसांनी आता या प्रकरणात कारवाई करत डेव्हिसला अटक केली आहे. सध्या केवळ एका महिलेने औपचारिकपणे त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. परंतु, आरोपी व्यक्तीविरूद्ध इतर आरोप निश्चित केले जाऊ शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे. डेव्हिसच्या तावडीतून बाहेर पडण्याचा ज्या महिलांना प्रयत्न केला त्या महिलांनी त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती असेही पोलिसांनी म्हटले आहे.