Jugaad Viral Video : जगातील तज्ञ लोक वेगवेगळं तंत्रज्ञान शोधून काढत आहेत. तर त्याच बाजुला भारतातील अनेक लोक जबरदस्त देशी जुगाड शोधत आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी वेगवेळ्या जुगाड व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या जुगाडचा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, या व्हिडिओमध्ये कार आणि ऑटोचे जबरदस्त कॉम्बिनेशन केलेलं दिसत आहे. यामुळे याला ऑटो म्हणावं की कार हे कळत नाहीये.
आजपर्यंत तुम्ही जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण, या व्हायरल व्हिडिओमध्ये एका भारतीयाने असा जुगाड केलाय की, ज्याने लोकांची मने जिंकली. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कार रस्त्यावर धावत आहे. ही गाडी पाहून तुम्हाला वाटले असेल की ही कार आहे. पण, जेव्हा कारचा पुढचा भाग पाहतात या वाहनाला पाहणारे सर्व लोक थक्क होतात. कारण, प्रत्यक्षात ते एक ऑटो आहे. वास्तविक, ड्रायव्हरने ऑटोमध्ये अशा प्रकारे बदल केले आहेत की ती कार असल्याचं वाटते.
ड्रायव्हरने ऑटोमधील लोकांना ज्या पद्धतीने कारची अनुभूती दिली आहे त्यामुळे सोशल मीडिया यूजर्सची मने जिंकली असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'comedynation.teb' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर, 15 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर लोक या व्हिडिओचा आनंद लुटताना त्यावर कमेंट करत आहेत.