बघा गार्डन ऑन व्हील्स

Auto Garden Viral Video, Auto driver planted of plant on auto roof watch viral video : गार्डन ऑन व्हील्स सुरू झाले आहे. हे ऑटो गार्डन अल्पावधीत कमालीचे लोकप्रिय झाले आहे

Auto Garden Viral Video, Auto driver planted of plant on auto roof watch viral video
गार्डन ऑन व्हील्स 
थोडं पण कामाचं
  • गार्डन ऑन व्हील्स
  • ऑटो गार्डन अल्पावधीत कमालीचे लोकप्रिय
  • गार्डनमुळे ऑटोत बसणाऱ्यांना बाहेरच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यास मदत होत आहे

Auto Garden Viral Video, Auto driver planted of plant on auto roof watch viral video : भारतात नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत. राजधानी दिल्लीसह भोवतालच्या परिसरात तापमान ४२ अंश से. च्या घरात आहे. उन्हात बाहेर फिरणे नागरिक टाळत आहेत. या अशा वातावरणात नागरिकांना दिलासा देण्यासाठी गार्डन ऑन व्हील्स सुरू झाले आहे. हे ऑटो गार्डन अल्पावधीत कमालीचे लोकप्रिय झाले आहे. 

ऑटो चालकाने स्वतःच्या ऑटोच्या छतावर छोटेखानी गार्डन विकसित केले आहे. या गार्डनमुळे ऑटोत बसणाऱ्यांना बाहेरच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यास मदत होत आहे. ऑटो गार्डनमधील फुले, फळे आणि आकर्षक झाडे पाहून उन्हाला वैतागलेल्या नागरिकांना बरे वाटत आहे. अनेकांनी ऑटोच्या छतावरील गार्डनचे फोटो आणि व्हिडीओ करून सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे. यामुळे अल्पावधीत गार्डन ऑन व्हील्स अर्थात ऑटो गार्डन व्हायरल झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी