Rab ne bana di jodi : "कबूल है... कबूल है.. " अझीम आणि बुशराच्या लग्नाची अजब गोष्ट, सोशल मीडियावर photo viral

व्हायरल झालं जी
Updated Nov 04, 2022 | 15:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rab ne bana di jodi : अडीच फूट उंचीचा वर, आणि तीन फूट उंचीची वधू यांचा अजब विवाह नुकताच पार पडला. या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याची (marriage) अजब गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते ही या फोटोंच्या (photo viral on social media) माध्यमातून .

azeem masoori and bushra marriage photos viral on social media
एका अजब लग्नाची गजब गोष्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अझीम आणि बुशराच्या लग्नाची गोष्ट
  • धूम धडाक्यात झालं या आगळ्यावेगळ्या जोडीचं लग्न
  • पीएम मोदी, योगी आदित्यनाथ आणि सलमान खानलाही वधू शोधण्यासाठी अझीमने केली होती विनंती

Rab ne bana di jodi : अडीच फूट उंचीचा वर, आणि तीन फूट उंचीची वधू यांचा अजब विवाह नुकताच पार पडला. या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याची (marriage)
अजब गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते ही या फोटोंच्या (photo viral on social media) माध्यमातून . (azeem masoori and bushra marriage photos viral on social media )

\


उत्तर प्रदेशातील शामली इथे राहणाऱ्या अझीम मंसूरी याच लग्नाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. हापूरा इथे राहणाऱ्यातीन फूट उंचीच्या बुशरासह मोठ्या धुमधडाक्यात अजीमचं लग्न पार पडलं. यावेळी जवळच्या नातेवाईकांसह मित्रमंडळी उपस्थित होती. अझीमची वरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. अझीमला पाहण्यासाठी मोठी गर्दी यावेळी जमा झाली होती. 

खूप दिवसांपासून अझीमला लग्न करायचे होते. मात्र, उंची कमी असल्याने लग्न जमत नव्हतं. अझीमने पीएम मोदी, योगी आदित्यनाथ, बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांना वधू शोधण्याची विनंती केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अझीम एका रात्रीत सोशल मीडियाचा हिरो बनला आणि देशभरातून त्याच्यासाठी स्थळं येऊ लागली. 


बुधवारी लग्नासाठी निघालेल्या अझीमला त्याच्या वडिलांनी कडेवर उचलून घेतले होते. यावेळी आपण आपल्या बेगमला आणायला जात असल्याचं अझीमने सर्वांना सांगितलं. अखेर देवाने माझी प्रार्थना ऐकली. लग्नासाठी अझीमने शेरवानी घातली होती. लग्न होत असल्याचा आनंद अझीमच्या चेहऱ्यावर दिसत होता.
 

अझीमने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती, तर बुशरा लाल रंगाच्या लेहंगामध्ये खूप सुंदर दिसत होती. यावेळी वरातीत अझीमचे नातेवाईक जल्लोषात नाचत होते. अझीमनेही गाडीत बसल्या बसल्या हात हलवत आपला आनंद व्यक्त केला. 


29 वर्षीय अझीमची वरात बुशराच्या घरी पोहोचताच दुल्हेराजाला पाहायला सगळ्यांनी गर्दी केली लोकांनी अझीम अंसारी आणि बुशराला शुभेच्छा दिल्या. सर्वांनी या दोघांच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद दिले. या आगळ्यावेगळ्या कपलसोबत सेल्फी काढायलाही सगळ्यांनी एकच गर्दी केली होती. 

अझीमचे वडील आपल्या मुलाच्या लग्नाबद्दल खूपच खुश दिसत होते. अखेर अझीमचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या वडीलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आम्हीही अझीमचं लग्न लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रार्थना करत होतो. 

बुशरा हापूराच्या मजीदपुरा इथे राहणारी आहे. बुशराने बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. तर अझीमचा कपड्यांचा व्यवसाय आहे. अझीमचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचं लग्न ठरलं. हापूऱ्याला राहण्याऱ्या हाजी अय्यूब यांनी हे नातं जुळवून आणलंय. 

हाजी अय्यूब यांनी बुशराला पाहिलं होतं. त्यामुळे अझीम अंसारीचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांनी बुशराच्या घरच्यांना अझीमबद्दल सांगितले. त्यानंतर बुशराच्या घरच्यांनी अझीमला पाहिले आणि मग हे लग्न ठरलं. 

दोघांनीही कबूल है म्हणत लग्न स्वीकारलं. या लग्नसोहळा अतिशय मंगलमय वातावरणात झाला. अझीम आणि बुशरा दोघंही यावेळी खुश दिसत होते. 

अझीम आणि बुशराच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूजर यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एवढंच नाही तर त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी