हत्तीवर बसून योगा करताना पडले बाबा रामदेव, ट्विटरवर झाले ट्रेंड

व्हायरल झालं जी
Updated Oct 14, 2020 | 15:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Baba Ramdev: बाबा रामदेव मंगळवारी मथुरेतील महावनच्या रमणरेती आश्रमात योग शिबीर घेत होते. या दरम्यान ते हत्तीवर बसून प्राणायाम करत होते. 

baba ramdev
हत्तीवर बसून योगा करताना पडले बाबा रामदेव, ट्विटरवर ट्रेंड 

थोडं पण कामाचं

  • सोशल मीडियावर बाबा रामदेव ट्रेंड
  • हत्तीवर बसून करत होते योगा
  • हत्तीवरील बसलेले असताना नियंत्रण गमावल्याने खाली पडले

मुंबई: बाबा रामदेव (baba ramdev)यांचा एक व्हिडिओ(video viral on social media) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात ते हत्तीच्या पाठीवर बसून योगा(yoga) करताना दिसत आहेत. दरम्यान योगा करत असताना हत्ती हलल्याने ते नियंत्रण गमावत जमिनीवर पडतात. बाबांचा बॅलन्स बिघडल्याने ते जमिनीवर पडले. दरम्यान, या अपघातात बाबांना कोणतीही गंभीर जखमझालेली नाही. ते पडल्यावर स्वत: उठून कपडे झाडतात आणि सहकाऱ्यांसह हसू लागतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

ही घटना सोमवारी मथुरेच्या महावन स्थित आश्रमात घडली. दरम्यान, सोशल मीडियावर बाबांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. एका युझरने बाबांना जोकर म्हटले. त्याने ट्विट करत म्हटले, हत्तीवर हसून सर्कस करत होते आणि खाली पडलेय. दरम्यान, एकाने लिहिले की बाबा हत्तीवर खाली पडल्याने पोलिसांनी हत्तीला अटक केली आहे. 

याआधीही बाबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळेस ते सायकल चालवत होते. सायकल चालवतानाही ते जमिनीवर पडले होते. त्यावरूनही सोशल मीडियावर त्यांची एकच खिल्ली उडवली गेली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी