Blind Mystic Baba Vanga: महान भविष्यवर्ता आणि अंध बाबा वेंगा यांनी काही अविश्वसनीय भविष्यवाण्या केल्या आहेत त्यातील दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या असं वाटत आहे. त्याच्या भयानक भविष्यवाण्यांसाठी, बाबा वांगाने भविष्यवर्ता नॉस्ट्राडेमस प्रमाणेच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांनी वर्तवलेल्या भाकितांमध्ये त्यापैकी काही सध्या जगभर घडताना दिसत आहेत. हे भाकीत त्यांनी अनेक वर्षांपूर्वी केले होते. मात्र, आता ते या जगात नाहीत.
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये अनेक आशियाई देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये धोकादायक पूर येण्याची शक्यता वर्तवली होती आणि ती होत आहे. त्यांचे ते भाकीत खरे ठरत आहे, कारण या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत अतिवृष्टी झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला.
दुष्काळामुळे अनेक शहरांना पाणीटंचाईची झळ बसेल, असेही बाबा वेंगा म्हणाले होते, हे सध्या युरोपमध्ये घडत आहे. पोर्तुगालने आपल्या नागरिकांना त्यांच्या पाण्याच्या वापरावर मर्यादा घालण्यास सांगितले आहे आणि इटली सध्या 1950 नंतरच्या सर्वात वाईट दुष्काळाच्या झळा सोसत आहे.
2022 मध्ये त्यांनी केलेल्या 6 अंदाजांपैकी 2 खरे ठरले आहेत. त्याचवेळी बाबा म्हणाले होते की, यावर्षी सायबेरियातून आलेला नवा घातक विषाणू, एलियनचा हल्ला, टोळांचे आक्रमण आणि आभासी वास्तव वाढेल.
Read Also : नागरिकांनो ऐकलं का! मंत्रालयात Water Bottle not Allowed
वेंगाचा जन्म 1911 मध्ये झाला आणि 1996 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आधी केलेल्या भविष्यवाण्या नेहमी चर्चेत असतात. वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाण्या अनेक प्रमाणात खऱ्या ठरत आहेत. त्यामुळे जग नष्ट होण्याची भविष्यवाणी मानवाला चिंतेत पाडणारी आहे.
Read Also : 100 टक्के योग्य कामगिरी होत नसल्यानं Ben Stokesची निवृत्ती
वेंगा यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून उपचारासाठी पैसे नव्हते. अशा स्थितीत वेंगाची दृष्टी गेली. मात्र, अंध असूनही त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती देवान त्यांना दिली. सन 1996 मध्ये मध्ये मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी जगाविषयी भविष्यवाणी केली. 5079 मध्ये जगाचा अंत होईल, असे त्याने मृत्यूपूर्वी भाकीत केले होते.
Read Also : शनिदोषापासून मुक्त होण्यासाठी श्रावण शनिवार आहे महत्त्वाचा
मात्र, याआधीही त्यांचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत. 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेचे दोन 'स्टील बर्ड्स' नष्ट होतील, असे वेंगा यांनी 1989 मध्ये सांगितले होते. 9/11 च्या हल्ल्याचा संदर्भ म्हणून अनेकांनी याचा उल्लेख केला. 2004 थायलंडची सुनामी, बराक ओबामा यांचे अध्यक्षपद, सोव्हिएत युनियनचे पतन आणि पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे पुनर्मिलन यांचा समावेश त्यांच्या इतर भाकीतांमध्ये आहे.