बाल्कनीतून खाली पडल बाळं, चित्रपटाचा क्लायमॅक्सप्रमाणे धावत गेल्याने ती आज बनली super mom

Mother Saves Child Video : आईने मुलाला वाचवले व्हिडिओ: एक बाळ बाल्कनीतून पडणार असतानाच आईने जीव धोक्यात घालून बाळाला वाचवले. सुपरमॉमचा हा व्हिडीओ पाहून तुमचे केस उभे राहतील.

Baby fell down from the balcony, she did something that made her a super mom today
बाल्कनीतून खाली पडल बाळं, चित्रपटाचा क्लायमॅक्सप्रमाणे धावत गेल्याने ती आज बनली super mom  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • आईने जीव धोक्यात घालून मुलाला वाचवले
  • सुपरमॉमचा हा व्हिडीओ पाहून तुमचे केस उभे राहतील.
  • बाल्कनीतून पडणाऱ्या बाळाला झेप घेऊन पकडले

मुंबई : आपलं लहान मूल बाल्कनीतून पडणार असल्याचे दिसताच आईने जीव धोक्यात घालून मुलाला वाचवले. सुपरमॉमचा हा व्हिडीओ पाहून तुमचे केस उभे राहतील. व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलासोबत लिफ्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. यानंतर आई फोनवर बोलत असताना कोपऱ्यात उभी असते. त्याचवेळी त्याचे मूल बाल्कनीकडे जाते. (Baby fell down from the balcony, she did something that made her a super mom today)

रेलिंग धरताना खाली पडले

बाल्कनीत रेलिंग धरण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण कमी लांबीमुळे त्याला रेलिंग धरता येत नाही आणि तो खाली पडू लागतो. दरम्यान, आई देवीसारखी झेप घेऊन मुलाचे पाय पकडते. ही सर्व घटना पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जर चुकून मूल खाली पडले असते तर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जीवही जाऊ शकला असता, पण आईने दैवत बनून आपल्या मुलाला वाचवले. व्हिडिओ पहा-

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Meme wala (@memewalanews)


व्हिडिओ पाहून सुरुवातीला वाटतं की मूल खाली पडलं असावं, पण जेव्हा आई त्याचे पाय धरून वर खेचते तेव्हा हे एखाद्या चित्रपटाचा क्लायमॅक्स असल्यासारखे वाटते. यादरम्यान तेथे उपस्थित लोक धावत मदत करायला येतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल, 'आई तू ग्रेट आहेस' हा व्हिडिओ memewalanews नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जिथून हा व्हिडिओ खूप बघायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी