Viral Video: धावत्या कारमधून चिमुकली रस्त्यावर पडली आणि मग..., अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

girl fall down from car: सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, एक चिमुकली धावत्या कारमधून रस्त्यावर खाली पडते.

baby girl fall from running car caught in cctv watch viral video
Viral Video: धावत्या कारमधून चिमुकली रस्त्यावर पडली आणि मग..., अंगावर काटा आणणारा व्हिडिओ 
थोडं पण कामाचं
  • धक्कादायक व्हिडिओ आला समोर
  • चिमुकली धावत्या कारमधून खाली पडली
  • चिमुकली कारमधून पडल्याचं चालकालाही कळालं नाही

Shocking Video goes viral: सोशल मीडियात दररोज काही ना फोटोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओज हे मजेशीर असतात तर काही व्हिडिओ खूपच भयंकर असे असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. कारण, एका धावत्या कारमधून एक चिमुकली गाडीतून खाली पडत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. (baby girl fall from running car caught in cctv watch viral video)

व्हिडिओत दिसत आहे की, एक मुलगी गाडीतून खाली पडते आणि या गाडी चालकाला याबाबत काहीही कल्पनाही नसते. त्यामुळे गाडी चालक हा आपली गाडी सरळ पुढे नेताना दिसतो. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ चीनमधील शांघाई येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निंगबो परिसरात एका ट्रॅफिक सिग्नलवर गाड्या उभ्या असतात. त्यावेळी एक चिमुकली कारच्या खिडकीतून डोकावत बाहेर पाहत असते. ही मुलगी डोकावून बाहेर पाहत असते आणि तितक्यात सिग्नल सुटल्याने कार पुढे निघून जाते.

कार झटक्यात पुढे गेल्याने ही मुलगी खिडकीतून थेट रस्त्यावर कोसळते. ही मुलगी पडल्याचं चालकाच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे तो गाडी चालवत पुढे निघून जातो. मात्र, मागून येणाऱ्या गाड्यांच्या चालकांनी हे पाहून लगेच आपल्या गाड्या थांबवल्या. त्यानंतर या गाडीतून काही नागरिक उतरतात आणि ते या लहानग्या मुलीला उचलतात.

अधिक वाचा : Optical Illusion: तुम्ही या चित्रात 10 सेकंदात हरण शोधू शकतात का, फक्त 3 टक्के लोक पास

या चिमुकलीचे नशीब खूपच चांगले होते आणि त्या मुलीला मोठी दुखापत झालेली नाही. तर किरकोळ खरचटलं आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ @sirajnoorani नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी