Banana Snake : ही केळी नव्हे तर साप, केळी सारख्या दिसणार्‍या सापाचा व्हिडीओ व्हायरल

आपल्या निसर्गात अनेक रहस्य दडलेली आहेत. कधी कधी ही रहस्यं एकदम समोर येतात आणि आपण अचंबित होऊन जातो. जगात अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आहेत, परंतु काही प्राण्यांचा आकार किंवा रंग पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. असाच एक विचित्र रंगाचा साप समोर आला आहे. हा साप हुबेहूब एखाद्या केळीप्रमाणे दिसत आहे. सुरूवातीला तुम्हाला केळी आणि या सापामध्ये काहीच फरक जाणवणार नाही. परंतु साप जेव्हा थोडी हालचाल करतो तेव्हा हा साप आल्याचे लक्षात येतं. 

snake banana
केळीसारखा दिसणारा साप   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगात अनेक प्रकारचे प्राणी पक्षीत आहेत, परंतु काही प्राण्यांचा आकार किंवा रंग पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
  • असाच एक विचित्र रंगाचा साप समोर आला आहे.
  • हा साप हुबेहूब एखाद्या केळीप्रमाणे दिसत आहे.

Snake Looks Like A Banana: आपल्या निसर्गात अनेक रहस्य दडलेली आहेत. कधी कधी ही रहस्यं एकदम समोर येतात आणि आपण अचंबित होऊन जातो. जगात अनेक प्रकारचे प्राणी पक्षी  आहेत, परंतु काही प्राण्यांचा आकार किंवा रंग पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. असाच एक विचित्र रंगाचा साप समोर आला आहे. हा साप हुबेहूब एखाद्या केळीप्रमाणे दिसत आहे. सुरूवातीला तुम्हाला केळी आणि या सापामध्ये काहीच फरक जाणवणार नाही. परंतु साप जेव्हा थोडी हालचाल करतो तेव्हा हा साप आल्याचे लक्षात येतं. (banana look like snake video viral on social media read in marathi)

अधिक वाचा : Viral Video : शंभर वर्षांच्या लष्करी अधिकाऱ्याने उभं राहून केला सॅल्यूट

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात एक केळी आणि साप दिसत आहे. सुरूवातीला साप आणि केळी यांच्यातले अंतरच कळत नाहिये. परंतु जेव्हा साप थोडी हालचाल करतो आणि आपली जीभ बाहेर काढतो तेव्हा चटकन हा साप असल्याचे लक्षात येतं. एक माणून हा साप उचलतो आणि या सपाची हालचाल होते. असा केळी सारखा दिसणारा साप खरंच अस्तित्वात आहे यावर विश्वास बसत नाही. 

अधिक वाचा : Optical Illusion : घुबडांच्या गर्दीत लपली आहे मांजर; 15 सेकंदात दाखवा शोधून, 99 टक्के लोक झाले फेल


बनाना बॉल पायथॉन

जगात सापाच्या अनेक जाती आहेत. केळी सारखा दिसणार्‍या सापच्या प्रजातीचे नाव बनाना बॉल पायथॉन असे आहे. केळी सारखा दिसत असल्याने या सापाला बनाना बॉल पायथॉन नाव पडले आहे. इन्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्चचकित झाले आहेत. याला हजारो व्ह्युज मिळाले असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा :  Viral Video: विहिरीत उतरुन केली घोडचूक! खाली सापडले डझनभर साप

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी