Viral: बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमान ईदच्या फोटोंवरून होतोय ट्रोल

व्हायरल झालं जी
Updated May 04, 2022 | 11:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mustafizur Rahman Viral Photo । सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असते. कधी एखाद्या फोटोची चर्चा होते, तर कधी एखाद्या व्हिडिओने धुमाकूळ घातलेला असतो. मुद्दा कोणताही असो सोशल मीडियावरील युजर्स याच्यावर खूप मजा घेतात.

Bangladeshi bowler Mustafizur Rahman is being trolled from Eid photos 
बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमान ईदच्या फोटोंवरून ट्रोल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असते.
  • सध्या मुस्तफिजुर रहमानचे ईदचे फोटो व्हायरल होत आहेत.
  • बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमान ईदच्या फोटोंवरून ट्रोल.

Mustafizur Rahman Viral Photo । मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असते. कधी एखाद्या फोटोची चर्चा होते, तर कधी एखाद्या व्हिडिओने धुमाकूळ घातलेला असतो. मुद्दा कोणताही असो सोशल मीडियावरील युजर्स याच्यावर खूप मजा घेतात. यादरम्यान बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत आणि त्याला ट्रोल करत आहेत. (Bangladeshi bowler Mustafizur Rahman is being trolled from Eid photos). 

अधिक वाचा : मुंबईतील ८०३ मशिदींना लाऊडस्पीकरची परवानगी, पोलिसांनी दिली

ईदच्या फोटोवरून मुस्तफिजुर ट्रोलर्सच्या निशाण्यावर 

दरम्यान, मुस्तफिजुर रहमानने (Mustafizur Rahman) सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा देतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुस्तफिजुरसोबत बुरखा घातलेली एक महिला दिसत आहे. हा फोटो शेअर होताच व्हायरल झाला आणि लोकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. कारण नेटकऱ्यांना माहित नाही की फोटोमध्ये असलेली महिला कोण आहे? काही लोक मुस्ताफिजुरने त्या महिलेबद्दल सांगण्याचा सल्ला देत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे एक लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. तसेच ३,६०० हून अधिक लेकांनी रिट्विट केले आहे. 

बांगलादेशी क्रिकेटर मुस्ताफिजुर सध्या आयपीएल खेळत आहे. मुस्ताफिजुर यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा हिस्सा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी