किशोरवयीन प्रेमीने केली आत्महत्या, कुटुंबियांनी जबरदस्ती मृतदेहाच्या अंगठ्याने भरली मुलीची मांग

व्हायरल झालं जी
Updated May 31, 2021 | 16:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रियकराने आत्महत्या केल्यावर कुटुंबियांनी मृतदेहाच्या अंगठ्याने त्याच्या प्रेयसीची मांग भरण्याचा विचित्र प्रकार घडला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील बर्धवान येथे घडली आहे.या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

Bardhhaman Minor Suicide
प्रियकराच्या मृतदेहाच्या अंगठ्याने भरील मुलीची मांग  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • बंगलामधील बर्धवान येथील घटना
  • प्रियकर आणि प्रेयसी दोघेही किशोरवयीन
  • प्रियकराच्या मृतदेहाच्या अंगठ्याने भरील मुलीची मांग

नवी दिल्ली : प्रेमात (Love Affair) पडल्यावर आपल्याकडे असेल ते सर्व पणाला लावण्याची तयारी प्रेमात असणाऱ्या युगुलांची (Lovers) असते. काहीजण प्रेम (Love) मिळाले नाही किंवा आपल्याला नकार मिळाला म्हणून आत्महत्या (Suicide) करतात. अशा बातम्या आपल्या आसपास आपल्याला अनेकवेळा ऐकायला किंवा वाचायला मिळत असतात. मात्र प्रियकराने आत्महत्या केल्यावर कुटुंबियांनी मृतदेहाच्या (Dead body of lover) अंगठ्याने त्याच्या प्रेयसीची मांग भरण्याचा विचित्र प्रकार घडला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील (West Bengal) बर्धवान (Bardhhaman) येथे घडली आहे. एका किशोरवयीन मुलाचे एका किशोरवयीन मुलीवर प्रेम होते. त्या किशोरवयीन मुलाने आत्महत्या केल्यावर संतापलेल्या लोकांनी त्या किशोरवयीन मुलाच्या अंगठ्यानेच त्या किशोलवयीन मुलीची (Minor Girl) मांग भरण्याची घटना बर्धवान येथे घडली आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. (Bardhaman Minor Suicide : Minor Boy commits Suicide after girls mother opposes to marriage at bardhaman in West Bengal)

नेमके काय घडले


पश्चिम बंगालमधील बर्धवान येथे एका किशोरवयीन मुलाचे एका किशोरवयीन मुलीवर प्रेम होते. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याची माहिती समोर येते आहे. दोघांचेही कुटुंबिय या लग्नासाठी तयार झाले होते. मात्र तो मुलगा आणि मुलगी हे दोघेही किशोरवयीन आहेत. ते दोघेही कायद्याने अज्ञान आहेत. त्यामुळे मुलीच्या आईचा या लग्नाला विरोध होता. या मुद्द्यावरून मुलगा आणि मुलीमध्ये भांडण झाले. त्यानंतर त्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

लोकांनी मृतदेहानेच भरली मुलीची मांग


आत्महत्या करण्याआधी त्या किशोरवयीन मुलाचे आपल्या प्रेयसीशी बोलणे झाले होते. त्यावेळेस त्या मुलाने आपण आत्महत्या करत असल्याचे आपल्या प्रेयसीला सांगितले. त्यानंतर त्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला व्हॉट्सअपद्वारे आपला फोटो पाठवला होता. फोटो पाठवल्यानंतर या प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडल्याबरोबर पोलिस तेथे पोचली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्ट मॉर्टमसाठी पाठवून दिला. पोस्ट मॉर्टम झाल्यावर प्रियकराचा मृतदेह गावात पोचवण्यात आला. मुलाचा मृतदेह गावात पोचल्याबरोबर तेथे जोरदार वाद सुरू झाला. तेथील परिस्थिती तणावग्रस्त झाली.

गावकऱ्यांची भूमिका


प्रियकराचा मृतदेह गावात पोचल्याबरोबर त्या गावातील लोकांनी त्या किशोरवयीन मुलीला आणि तिच्या आईला त्या मुलाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरवले. त्यानंतर त्या मुलीला आणि तिच्या आईला गावकऱ्यांनी मारहाण केली. त्या दोघींनाही जबरदस्तीने घरातून काढून त्या मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आले. त्यानंतर त्या प्रियकराच्या मृतदेहाच्या अंगण्याने त्या मुलीची मांग भरण्यात आली. तो मुलगा बर्धवानमधील कांटापुकुर परिसरातील राहणार आहे. प्रियकराच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की तो मुलगा आत्महत्या करण्यासाठी जातो आहे याची त्या मुलीला पूर्ण कल्पना होती. त्या मुलीकडे मुलाच्या आईचा मोबाईल नंबर होता. मात्र असे असूनही त्या मुलाच्या कुटुंबियांना याबाबत कळवण्यात आले नाही. जर वेळीच त्या मुलाच्या कुटुंबियांना या प्रकाराची माहिती देण्यात आली असती तर त्या मुलाचा जीव वाचवता आला असता, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. 

पोलिस या सर्व प्रकाराचा तपास करत आहेत. त्या मुलीच्या आईने तिला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याची तक्रार केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस या सर्व प्रकरणाचा तपास सध्या करत आहेत. दोषी व्यक्तींना लवकरच ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी