Viral Video : दोन सापांची लढाई, एकाने दुसऱ्याला गिळले

battle of two snakes, one swallowing other snake, Two Snake Fight, Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या सोशल मीडियावर दोन सापांच्या लढाईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

battle of two snakes, one swallowing other snake, Two Snake Fight, Viral Video
Viral Video : दोन सापांची लढाई, एकाने दुसऱ्याला गिळले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : दोन सापांची लढाई, एकाने दुसऱ्याला गिळले
  • सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
  • नेचर ओके (Nature Okay) नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ आहे

battle of two snakes, one swallowing other snake, Two Snake Fight, Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या सोशल मीडियावर दोन सापांच्या लढाईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघताना काही जणांना त्रास होऊ शकतो. यामुळे मनाने खंबीर असलेल्यांनीच हा व्हिडीओ बघावा. । व्हायरल झालं जी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by @nature_okay

व्हायरल व्हिडीओत दोन सापांची लढाई सुरू असल्याचे दिसत आहे. मातीच्या रस्त्यावर ही लढाई सुरू आहे. संघर्ष अतिशय तीव्र आहे. या संघर्षात एका सापाची सरशी होताना दिसते. तो साप संधी साधून दुसऱ्याला सापाला गिळताना दिसतो. छोट्या सापाला मोठा साप सहज गिळून टाकतो. 

व्हिडीओत आधी मातीच्या रस्त्यावर सरपटत असलेले दोन साप दिसतात. हे दोन सा दोन वेगवेगळ्या दिशांनी एकमेकांच्या समोर येताना दिसतात. एकमेकांसमोर आल्यावर त्यांचा संघर्ष सुरू होतो. या संघर्षात मोठ्या सापाची सरशी होताना दिसते. तो संधी साधून छोट्या सापाला गिळून टाकतो. 

जीवंत असलेल्या छोट्या सापाला मोठा साप गिळतो हे व्हिडीओत स्पष्ट दिसते. छोट्या सापाने प्रतिकार करूच नये यासाठी मोठा साप स्वतःच्या शरीराला वेटोळ्या आकारात फिरवून गिळत असलेल्या सापाचा मृत्यू होईल याची खबरदारी घेताना व्हिडीओत दिसतो. हा थरार वाचण्यापेक्षा व्हिडीओत बघणे जास्त प्रभावी ठरू शकते.

सोशल मीडियावर सध्या दोन सापांच्या लढाईचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. नेचर ओके (Nature Okay) नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ आहे. हजारो नागरिकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी