Shocking News IN Marathi | मुंबई : स्पर्म दान करण्याच्या खूप विचित्र घटना जगभरातून समोर येत असतात. यामधील काही प्रकरणे अशी देखील असतात ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. सध्या ब्रिटनमधून स्पर्म डोनेशनबाबत असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याचे सत्य जाणून लोक हैराण झाले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे हे प्रकरण कोर्टात पोहोचले. कारण जो व्यक्ती आपले स्पर्म अनोळखी महिलांना दान करत होता, त्याने एक गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. ज्याबद्दल महिलांना आता खूप पश्चाताप होत आहे. (Became a father of 15 children by donating sperm, Now came the shocking truth).
अधिक वाचा : ५ जूनपासून शनि वक्र स्थितीत होणार मार्गस्थ, वाचा सविस्तर
दरम्यान, ३७ वर्षीय 'विक्की डोनर'चे नाव जेम्स मॅकडोगल आहे. स्पर्म दान करून जेम्स आतापर्यंत १५ मुलांचा बाप बनला आहे. जेम्स आपले स्पर्म फक्त लेस्बियन महिलांना दान करत होता. पण त्याला फ्रेजाइल एक्स सिंड्रोम (Fragile X syndrome) असल्याचे सत्य त्याने लपवून ठेवले होते. त्यामुळे मुलांना आता शिक्षणात अडचणी येण्याची शक्यता आहे. खर तर लेस्बियन महिलांसाठी सोशल मीडियावर एक पेज आहे, जे स्पर्म डोनर शोधत आहेत. जेम्सने त्याची जाहिरातही त्या पेजवर शेअर केली आहे. मात्र त्याला आजार असल्याचे त्याने सांगितले नाही. एवढेच नाही तर जेम्सला त्याच्या आजाराची माहिती मिळाल्यापासून तो डॉक्टरांकडे देखील जात नाही.
आता हे प्रकरण कोर्टात पोहचले आहे. कोर्टाने सांगितले आहे की २५ वर्षाची एक मुलगी जेम्सच्या संपर्कात आली होती. तिने जेम्सच्या स्पर्मपासून दोन मुलांना जन्म दिला आहे. त्यामधील एक मुलगा तीन वर्षांचा आहे, तर दुसरे मुल २ वर्षांचे आहे. एका मुलाला नीट बोलता येत नाही, तर दुसऱ्याच्या मेंदूचा योग्य विकास झालेला नाही. कोर्ट म्हणते की जेम्स सर्व गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे त्याला आता स्पर्म दान करण्यापासून रोखण्यात आले आहे. तसेच जेम्सला दत्तक घेतलेल्या महिलेचे म्हणणे आहे की जेम्स खूप चांगला आणि भोळा माणूस आहे. त्याला फक्त लेस्बियन लोकांना मदत करायची होती आणि त्यांना व्हायचे होते. त्यासाठी त्याने पैसे देखील घेतले नाहीत.