Sindoor Ceremony : वधूची ‘मांग भरण्यापूर्वी’ नवरदेवाच्या कृत्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का, पाहा VIDEO

होणाऱ्या पत्नीच्या ‘मांग मे सिंदूर’ भरताना नवरदेवाने असं काही केलं, की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Sindoor Ceremony
वधूची ‘मांग भरण्यापूर्वी’ नवरदेवाच्या कृत्याने सर्वांना धक्का  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • भांगात कुंकू भरण्यापूर्वी नवरदेवाने व्यक्त केलं प्रेम
  • नवरदेवाची कृती पाहून अगोदर धक्का, मग समाधान
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Sindoor Ceremony : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपलं लग्न कसं व्हावं, त्यावेळी आपण काय करावं, मंडप कसा असावा, पद्धत कशी असावी यासारख्या अनेक गोष्टींची स्वप्नं अनेकजण कॉलेजपासूनच पाहत असतात. काहीजणांना अगदी शाही पद्धतीनं आपलं लग्न व्हावंसं वाटत असतं. काहीजणांना लग्नात आपली एन्ट्री जोरदार आणि लक्षवेधी व्हावी, असं वाटतं. तर काहीजणांना मात्र लग्नात खर्च करणं मान्य नसतं. अगदी साध्या पद्धतीनं लग्न करणं ते पसंत करतात. भारताच्या काही भागात लग्न लागल्यानंतर वराने वधूच्या भांगात कुंकू भरण्याचा विधी केला जातो. या विधीला विशेष महत्त्व असतं आणि हा क्षण डोळ्यात साठवून घेण्यासाठी वर आणि वधूसह त्यांचे जवळचे नातेवाईकदेखील उत्सुक असतात. एका लग्नात नवरदेव आपल्या होणाऱ्या वधूच्या भांगात कुंकू भरत असताना त्याने असं काही केलं की सर्वांनाच आश्चर्य वाटलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by (@the_wedding_dance_india)

सिंदूर भरण्याचा कार्यक्रम

कुंकवाला हिंदी भाषेत सिंदूर म्हटलं जातं. सिंदूर भरण्याचा हा कार्यक्रम सुरू असल्याचं सध्या व्हायरल होत असललेल्या व्हिडिओत दिसतं. नवरदेव हातात सिंदूर घेऊन तयार आहे. वधू वराकडे पाहत आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणासाठी सज्ज झाली आहे. वधूची आईदेखील त्यांच्यासमोर उभी असून आपल्या लेकीच्या आयुष्यातील हा मोठा सोहळा पाहताना ती काहीशी भावूक झाल्याचं दिसतं. सगळे नातेवाईक आजूबाजूला उभे आहेत आणि हा सोहळा टिपण्यासाठी कॅमेरामनदेखील सज्ज असल्याचं दिसतं. 

अधिक वाचा - Viral Video : डॉक्टरसमोर रुग्णाला हृदयविकाराचा झटका, नंतर काय घडले ते बघाच!

नवरदेवाने घेतले कपाळाचे चुंबन

आपल्या पत्नीच्या भांगात कुंकू भरण्याची सूचना गुरुजी नवरदेवाला करतात. त्यानंतर सिंदूर भऱण्यापूर्वी नवरदेव अलगद आपला चेहरा वधूच्या डोक्यापाशी नेतो आणि तिच्या कपाळावर हलकेच चुंबन देतो. त्यानंतरच तो तिच्या भांगात कुंकू भरतो. 

अगोदर धक्का, मग आनंद

या महत्त्वाच्या सोहळ्यात नवरदेव असं काही करेल, याची कदाचित कुणी कल्पनाही केली नसेल. त्यामुळे नवरदेवाने कपाळाचे चुंबन घेताच अगोदर त्याच्या पत्नीला धक्का बसतो आणि नंतर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता तो सुखद धक्का असल्याचं समजतं. तिच्या आईलाही अगोदर आश्चर्य वाटतं. मात्र आपल्या होणाऱ्या जावयाचं लेकीवर किती प्रेम आहे, हे समजल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव झळकतात. 

अधिक वाचा - Viral Video : Reel करणे जीवावर बेतले

व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. पारंपरिक पद्धतीने लग्न करताना एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी नवरदेवाने जी संधी साधली, ती पाहून अनेकांना कौतुक वाटत आहे. हा व्हिडिओ जोरदार शेअर केला जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी