वाचा १३ कोटींच्या कबुतराची गोष्ट

Belgium Racing Pigeon Sells For World Record Price चीनमधील एकाने १३ कोटी ४० लाख रुपये खर्चून एक कबुतर खरेदी केले. बेल्जियमच्या 'पीजन पॅरेडाइज'ने ऑनलाइन पद्धतीने १३ कोटी ४० लाख रुपयांना कबुतराचा लिलाव केला.

Belgium Racing Pigeon Sells For World Record Price
वाचा १३ कोटींच्या कबुतराची गोष्ट 

थोडं पण कामाचं

  • वाचा १३ कोटींच्या कबुतराची गोष्ट
  • तीन वर्षांच्या मादी कबुतराचे नाव न्यू कीम, किंमत १३ कोटी ४० लाख रुपये
  • चिनी नागरिकाने लिलावात बोली लावून विकत घेतले कबुतर

नवी दिल्ली: चीनमधील एका व्यक्तीने १३ कोटी ४० लाख रुपये खर्चून एक कबुतर खरेदी केले. बेल्जियमच्या 'पीजन पॅरेडाइज'ने ऑनलाइन पद्धतीने १३ कोटी ४० लाख रुपयांना कबुतराचा लिलाव केला. चिनी व्यक्तीने विकत घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या या कबुतराचे नाव 'न्यू कीम' असे आहे. हे तीन वर्षांचे मादी कबुतर आहे. (Belgium Racing Pigeon Sells For World Record Price To Mystery Chinese Buyer At Auction)

चीनमध्ये दरवर्षी पक्ष्यांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सुपर डूपर आणि हिटमॅन या दोन चिनी ओळख सांगणाऱ्या ऑनलाइन युझरकडून सतत मोठी बोली लावली जात होती. अखेर ही बोली १३ कोटी ४० लाख रुपये या रकमेवर थांबली आणि एका चिनी नागरिकास कबुतर खरेदी करणे शक्य झाले. पक्षांच्या स्पर्धेत सातत्याने छान कामगिरी करणाऱ्या 'न्यू कीम' कबुतराकडून खरेदीदार चिनी नागरिकाला प्रचंड आशा आहे. 

मागच्या वर्षी 'पीजन पॅरेडाइज'ने केलेल्या लिलावात अरमांडो नावाचे कबुतर ११ कोटी रुपयांना विकले गेले होते. यंदा मागच्या वर्षीपेक्षा मोठ्या रकमेची बोली लागली. 'पीजन पॅरेडाइज'ने ऑनलाइन पद्धतीने १३ कोटी ४० लाख रुपयांना 'न्यू कीम' नावाच्या कबुतराची विक्री केली. या निमित्ताने कबुतरासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बोली लागली. 'न्यू कीम' नावाच्या कबुतराने लिलावात नवा विक्रम स्थापन केला. एवढ्या मोठ्या रकमेला विकले गेलेले हे कबुतर आता पक्ष्यांच्या स्पर्धेत कशी कामगिरी करते याकडे चीनमधील पक्ष्यांच्या स्पर्धेचे चाहते लक्ष ठेवून आहेत.

याआधी २०१८ मध्ये 'न्यू कीम' नावाच्या कबुतराने फ्रांसमधील पक्ष्यांची स्पर्धा जिंकली होती. सरावातही त्याच्याकडून सातत्याने चांगली कामगिरी होत होती. याच कारणामुळे 'न्यू कीम' नावाच्या कबुतरासाठी लिलावात विक्रमी बोली लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

युरोपमधील पक्ष्यांच्या चीनमधील स्पर्धेसाठी होणारा वापर पुन्हा वाढू लागला आहे. याआधी १३६८ ते १६४४ या काळात चीनमध्ये मिंग राजवट पक्ष्यांच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करत होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने चीनमधील तसेच बाहेरच्या देशांतील पक्ष्यांचा समावेश होत होता. पक्ष्यांच्या स्पर्धेसाठी चीनमधील नागरिकांनी परदेशातून पक्षी खरेदी केल्याचे ४४५ पुरावे सापडले आहेत. विशेष म्हणजे तब्बल ४४५ वेळा चिनी नागरिकांनी लिलावात मोठी बोली लावून पक्षी खरेदी केले. नंतर काही काळ या स्पर्धांसाठीचा उत्साह मावळला होता. मात्र मागील काही वर्षांमध्ये पक्ष्यांच्या स्पर्धेची लोकप्रियता चीनमध्ये नव्याने आणि वेगाने वाढू लागली. या वाढत्या लोकप्रियतेमुळेच एका चिनी नागरिकाने पक्ष्यांच्या स्पर्धेत चॅम्पियन होण्याच्या उद्देशाने १३ कोटी ४० लाख रूपये मोजून 'न्यू कीम' नावाचे मादी कबुतर खरेदी केले. या कबुतराला तज्ज्ञांच्या मदतीने पक्ष्यांच्या स्पर्धेसाठी प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. कबुतर खरेदी करणाऱ्याचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. लिलावाच्या आयोजकांनी या संदर्भात गोपनीयता बाळगली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी