आइस्क्रीमचे 'कब्रस्तान'... जिथे गाडतात आइस्क्रीमचे फ्लेवर!

अमेरिकेतील कनेक्टिकटमधील वॉटरबरी शहरात जगातील एकमेव असे आइस्क्रीमचे 'कब्रस्तान' आहे.

Ben & Jerry’s ‘Flavor Graveyard’ where ice creams are laid to rest
आइस्क्रीमचे 'कब्रस्तान'... जिथे गाडतात आइस्क्रीमचे फ्लेवर! 

थोडं पण कामाचं

  • आइस्क्रीमचे 'कब्रस्तान'... जिथे गाडतात आइस्क्रीमचे फ्लेवर!
  • नागरिक या ठिकाणाला भेट देतात
  • आइस्क्रीमच्या जुन्या आणि आता बंद झालेल्या फ्लेवरची आठवण काढतात

वॉटरबरी: अमेरिकेतील कनेक्टिकटमधील वॉटरबरी शहरात जगातील एकमेव असे आइस्क्रीमचे 'कब्रस्तान' आहे. या ठिकाणी आइस्क्रीमचे फ्लेवर गाडले जातात. आइस्क्रीमच्या फ्लेवरची कबर तयार केली जाते म्हणून या जागेला आइस्क्रीमचे 'कब्रस्तान' या नावाने ओळखतात. नागरिक या ठिकाणाला भेट देतात. आइस्क्रीमच्या जुन्या आणि आता बंद झालेल्या फ्लेवरची आठवण काढतात. आठवणींना उजाळा देत आइस्क्रीमच्या फ्लेवरच्या कबरीवर फुलं वाहतात तसेच आठवणींना स्मरुन अनेकदा कबरीवर स्वतःचा संदेश लिहिलेला कागद ठेवून जातात. Ben & Jerry’s ‘Flavor Graveyard’ where ice creams are laid to rest

बेन अँड जेरी या प्रसिद्ध आइस्क्रीम ब्रँडने वॉटरबरी शहरातील त्यांच्या प्रकल्पाजवळ जगातील पहिले आइस्क्रीमचे 'कब्रस्तान' विकसित केले. या ठिकाणी आतापर्यंत ३५ आइस्क्रीमचे फ्लेवर गाडण्यात आले आहेत.

आइस्क्रीमच्या कब्रस्तानाची सुरुवात १९९७ मध्ये चार फ्लेवर गाडून झाली. आतापर्यंत या  कब्रस्तानात आइस्क्रीमचे ३५ फ्लेवर गाडण्यात आले आहेत. हे सर्व फ्लेवर बेन अँड जेरी कंपनीने बंद केलेल्या आइस्क्रीमचे फ्लेवर आहेत. नवे फ्लेवर लाँच करणे आणि जुने फ्लेवर कायमचे बंद करायचे ठरल्यावर त्यांना विशिष्ट पद्धतीने आइस्क्रीमच्या कब्रस्तानात गाडून टाकणे ही प्रक्रिया बेन अँड जेरी कंपनी अनेक वर्षांपासून करत आहे. विशेष म्हणजे आजही अमेरिकेत नागरिक वॉटरबरी शहरातील आइसस्कीम प्रकल्पाजवळ जगातील पहिले आइस्क्रीमचे 'कब्रस्तान' बघण्यासाठी गर्दी करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी