Importance of Helmet : म्हणून हेल्मेट वापरा…! हा व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी दिला संदेश

हेल्मेट वापरणं का गरजेचं आहे, हे दाखवण्यासाठी पोलिसांनी अपघाताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून हेल्मेटधारी बाईकस्वार कसा जीवघेण्या अपघातातून वाचला, हे दिसतं.

Importance of Helmet
म्हणून हेल्मेट वापरा…!  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • वाहतूक पोलिसांनी शेअर केला अपघाताचा व्हिडिओ
  • हेल्मेटमुळे वाचला बाईकस्वाराचा जीव
  • हायवे आणि शहर दोन्ही ठिकाणी हेल्मेटची गरज

Importance of Helmet : दुचाकीवरून (Bike riders) प्रवास करणाऱ्यांनी हेल्मेट (Helmet) वापरणं गरजेचं असल्याचा प्रचार नेहमीच सरकारी यंत्रणांकडून (Public agencies) केला जातो. हेल्मेट न वापरणाऱ्यांना अनेक ठिकाणी दंडाची (Fine) तरतूदही करण्यात आली आहे. मात्र तरीही अनेकजण हेल्मेटशिवाय प्रवास करताना दिसतात. भारतात होणाऱ्या एकूण दुचाकीच्या अपघातांपैकी हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण अधिक आहे. हेल्मेट वापरल्यामुळे जीवघेण्या अपघातातून वाचल्याचीही अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात, मात्र तरीही अनेकजण हेल्मेट वापरत नसल्याचं दिसतं. 

कर्नाटकमधील वाहतूक पोलिसांनी (Karnataka Traffic Police) सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हेल्मेट वापरणं का गरजेचं आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ पाहा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. एका अपघाताचा हा व्हिडिओ असून हेल्मेट असल्यामुळे दुचाकीस्वाराचे प्राण कसे वाचले, हे या व्हिडिओतून दिसत आहे. 

असा झाला अपघात

या व्हिडिओत एक बस वळण घेताना दिसते. काही क्षणात एक तरुण बाईकवरून भरधाव वेगाने येत असल्याचं दिसतं. मात्र अचानक त्याचा अपघात होतो आणि बाईकवरून तो थेट बसच्या चाकाखाली फेकला जातो. बसचं चाक त्याला काही अंतर फरफटत नेतं. त्याचं डोकं बसच्या चाकाखाली असतं आणि त्या अवस्थेतच तो काही अंतर ढकलला जातो. या बाईकस्वाराने डोक्यावर हेल्मेट घातलेलं असतं. त्यामुळे एवढ्या भीषण अपघातानंतरही तो जिवंत राहतो आणि थोड्याच वेळात बरा होतो, असं दिसतं. 

अधिक वाचा - Dance in Metro : मेट्रो ट्रेनमध्ये तरुणीचे ठुमके, व्हिडिओवरील प्रतिक्रिया तर डान्सपेक्षाही भन्नाट

ब्रँडेड हेल्मेट कसं ओळखायचं?

आयएसआय मार्क ही ब्रँडेड हेल्मेटची एकमेव खूण असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आपल्या जिवाची काळजी असेल तर प्रत्येकवेळी बाईक चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. व्हिडिओत दाखवलेल्या तरुणाने जर डोक्यावर हेल्मेट परिधान केले नसते, तर आज त्याची काय अवस्था झाली असती, याचा विचार करा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. डोक्याच्या सुरक्षेसाठी आयएसआय मार्क असणारं हेल्मेटच घेण्याचा सल्लाही वाहतूक पोलिसांनी दिला आहे. 

अधिक वाचा - Viral Video : पतीच्या मोबाईलमध्ये वाजला अलार्म, पत्नीने ‘असं’ झोपवलं की पुन्हा उठलाच नाही

शहरातही हेल्मेट वापरण्याचा सल्ला

हेल्मेटची गरज केवळ हायवेला असते, असं अनेकांना वाटतं. शहरात मात्र त्याची गरज नसल्याचा दावा अनेकजण करत असतात. मात्र पोलिसांनी हा दावा खोडून काढला आहे. व्हिडिओत दिसणारी ही घटना शहरातच घडली आहे. हेल्मेटची आवश्यकता जेवढी हायवेवर आहे तेवढीच शहरात आहे, हे या व्हिडिओतून सिद्ध होत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्याचा पोलिसांचा हा मार्ग अनेकांना आवडतो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी