Jaya Kishori Secretes: प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि कथावाचक जया किशोरी सध्या तिच्या लग्नाबद्दल खूप चर्चेत आहे. आपण सध्या लग्न करणार नसल्याचे तिने स्पष्ट केले असले तरी ती कोणाशी लग्न करणार असा प्रश्न तिच्या फॉलोअर्सना पडला होता. आता आपल्या फॉलोअर्सचे समाधान करण्यासाठी जया किशोरीने याबबत खुलासा केला आहे. (Biggest secret in Jaya Kishori's life know who will she get married)
याआधी जया किशोरीचे नाव बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीसोबत जोडले गेले होते आणि असे म्हटले जात होते की दोघे लग्न करणार आहेत. मात्र या दोघांनीही या अफवा असल्याचे म्हटलं होतं. इतकंच नाही तर धीरेंद्र शास्त्रींनी जया किशोरीला बहिण म्हटलं होतं.
अधिक वाचा: Jaya Kishori: मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांचे Love Quotes
जया किशोरीने आपल्या लग्नाबद्दल अनेक कार्यक्रमांमध्ये बोलून दाखवले असून आपण नक्कीच लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, ती कधी लग्न करणार हे तिने सांगितलेले नाही. सध्या लग्न करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. जया किशोरीने अलीकडेच लग्न ही एक मोठी जबाबदारी असल्याचे वर्णन केले होते आणि लग्नाचा निर्णय घाईघाईने घेऊ नये, तर काळजीपूर्वक विचार करूनच निर्णय घ्यावा, असा सल्लाही आपल्या फॉलोअर्सला दिला होता. यासोबतच केवळ एक-दोन महिने कुणाला भेटूनही आपण लग्न करू नये, असेही ती म्हणाली होती.
अधिक वाचा: कोकणवासियांसाठी खुशखबर !, बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा एक्सप्रेसचे काम डिसेंबरपर्यत होणार पूर्ण
जया किशोरीने लग्नासाठी एक मोठी अट ठेवली असून जो कोणी ती पूर्ण करेल त्याला ती आपला जीवनसाथी बनवेल असे म्हटले आहे. तिने अलीकडेच एका कार्यक्रमात सांगितले की, ती कोलकाता येथे राहणाऱ्या व्यक्तीशी ती लग्न करणार आहे. जया किशोरी तिच्या आई-वडिलांच्या खूप जवळ आहे आणि तिला त्यांच्यापासून दूर राहायचे नाही. यामुळेच तिने लग्नासाठी या अटी ठेवल्या आहेत. जर तिने कोलकात्याबाहेर राहणाऱ्या पुरुषाशी लग्न केले तर ती तिच्या आईवडिलांना सोबत ठेवणार असेही तिने सांगितले आहे.