Bike मध्ये पेट्रोल कमी होतं म्हणून पोलिसांनी फाडली पावती? सोशल मीडियात व्हायरल झाला फोटो

Fine for not having sufficient petrol: गाडीत पेट्रोल कमी असल्याने बाईकस्वाराला दंड ठोठावण्यात आला आहे. पोलिसांनी फाडलेल्या पावतीचा फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

bike rider fined by traffic police for not having sufficient fuel petrol know what is true
Bike मध्ये पेट्रोल कमी होतं म्हणून पोलिसांनी फाडली पावती? सोशल मीडियात व्हायरल झाला फोटो  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल कमी असल्याने बाईकस्वाराला दंड
  • सोशल मीडियात पावतीचा फोटो व्हायरल

Bike rider fined for non petrol e challan copy viral:  सोशल मीडियात एका ई चालानचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. एका बाईकस्वाराला पोलिसांनी पावती फाडून दंड ठोठावला आहे. दंड ठोठावताना "पुरेशा इंधनाशिवाय" बाईक चालवण्याचं कारण या पावतीवर देण्यात आलं आहे. हे प्रकरण केरळमधील असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियात या ई-चालानची कॉपी व्हायरल होताच विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

बाईकमध्ये कमी पेट्रोल असल्याने दंड ठोठावण्यात आल्याचं अनेकांना पटतच नाहीये. त्यानंतर या प्रकरणी बाईक रायडरने स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने सांगितले की, त्याच चालान कापण्यात आलं आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे वन-वे रोडवर तो चुकीच्या दिशेने बाईक चालवत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या बाईकवर फाडण्यात आलेल्या ई-चालानवर 'लो फ्युअल' असा उल्लेख केला आहे.

अधिक वाचा : Viral Video : अभ्यास करता करता चिमुकला बोलला गंभीर गोष्ट, तक्रार ऐकून आई झाली गप्प

पोलिसांकडून झाली चूक

रिपोर्ट्सनुसार, केरळमधील बेसिल शाम (Basil syam) हा आपल्या बाईकवरुन कामावर जात होता. कामावर जाण्यासाठी त्याला उशीर होत होता. त्यामुळे लवकर पोहोचण्यासाठी त्याने वन-वे रोडवरुन आपली बाईक नेली आणि चुकीच्या दिशेने गाडी चालवू लागला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याला पाहिले आणि रोखले.

अधिक वाचा : Party in the train : ट्रेनमध्ये बिकीनी गर्लसोबत पार्टी, दारुसह तरुणांचा नंगानाच, VIDEO झालाय Viral

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी बेसिल शाम याला २५० रुपयांचा दंड ठोठावत चालान कापलं. मात्र, नंतर बेसिल शाम याच्या लक्षात आलं की, पोलिसांनी जे ई चालान दिलं आहे त्यावर 'वन वे' मार्गावर विरुद्ध दिशेने बाईक चालवण्याने दंड ठोठावल्याचं म्हटलेलं नाहीये तर गाडीत कमी पेट्रोल असल्याने दंड ठोठावल्याचं म्हटलं आहे. त्याने फेसबूकवर या ई-चालानचा फोटोही शेअर केला आहे. हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

कमर्शियल वाहनांना आहे नियम

खरंतर, केरळ ट्रान्सपोर्ट लॉनुसार अशा प्रकारचं चालान हे कमर्शियल गाड्यांसाठी असतं. जे निर्धारित सीमेहून कमी इंधनासह गाडी रस्त्यावर चालवतात. याशिवाय जेव्हा-जेव्हा प्रवासी वाहनात असेल तेव्हा गाडी चालकाला पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजी भरता येत नाही. हे बेकायदेशील आहे. त्यामुळे तुम्ही टॅक्सीने प्रवास करत असाल आणि चालकाने पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजी भरायचं म्हणून गाडी थांबवली तर त्याबाबत तक्रार करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी