विचित्र प्रकार :  त्याने चोरल्या महिलांच्या ७०० च्या वर अंडरगार्मेंट्स, चोरी करताना सापडला, झाला भांडाफोड 

जपानमध्ये असा एक विचित्र छंद एका चोरीनंतर उघडकीस आला आणि तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

bizarre man arrested for stealing 700 pieces of womens underwear from launderette in japan
 त्याने चोरल्या महिलांच्या ७०० च्यावर अंडरगार्मेंट्स 

थोडं पण कामाचं

  • 56 वर्षीय अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला आणि आणखी 730 वस्त्रे सापडली
  • पोलिसांद्वारे ऑनलाईन शेअर केलेल्या फोटोमध्ये  जमिनीवर अंडरगार्मेंट्स अंथरलेली दिसत आहेत.  पोलिसांनी सांगितले की त्यांनी 'इतक्या वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात पँन्टीज जप्त केलेल्या नाहीत.'
  • ही घटना आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि नेटिझन्स त्या माणसाच्या विचित्र छंदामुळे चक्रावून गेले आहेत. आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव टेट्सूओ उराटा आहे. त्याला नाणे टाकून चालवलेल्या कपडे धुण्याच्या मशीनमधून सहा जोड्या पॅन्टीज चोरताना पकडण्यात आले आहे.

टोकिओ  : लोकांना कशाचा छंद असेल हे सांगणे कठीण आहे. आपला छंद पूर्ण करण्यासाठी लोक कोणत्याही थऱाला जाऊ शकतात. पण काही असे विचित्र छंद असतात की त्यामुळे लोक चोरी करायला लागतात. जपानमध्ये असा एक विचित्र छंद एका चोरीनंतर उघडकीस आला आणि तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

जपानमध्ये एका 56 वर्षीय आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्यावर आरोप आहे की तो सार्वजनिक लॉन्ड्रीमधील महिलांच्या सहा जोडी पॅन्टीज चोरत होता. टेट्सूओ उराटा असे आरोपीचे नाव आहे. 

अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला आणि आणखी 730 अंतर्वस्त्रे सापडली, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

पोलिसांद्वारे ऑनलाईन शेअर केलेल्या फोटोमध्ये  जमिनीवर अंडरगर्मेंट्स अंथरलेली दिसत आहेत.  पोलिसांनी सांगितले की त्यांनी 'इतक्या वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात पँन्टीज जप्त केलेल्या नाहीत.'

ही घटना आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि नेटिझन्स त्या माणसाच्या विचित्र छंदामुळे चक्रावून गेले आहेत. 

एका युजर्सने लिहिले, " नाणे टाकून कपडे धुण्याच्या मशीनमधून तू यापूर्वी एक किंवा दोन कपडे सहज चोरू शकता होता, परंतु आता ते सुरक्षा कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत म्हणू ते आताच थांबव."

"तुमचा सामान चोरीला जाणे केवळ वाईट नाही, पण नंतर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात आणि अधिकची खरेदी करावी लागेल. काय वेडेपणा आहे हा !" दुसऱ्या युजर्सने लिहिले.


जपानच्या माणसाचा पँन्टी चोरण्याचा प्रवास बराच मोठा आहे. यापूर्वी न्यूझीलंडमधील 65 वर्षीय व्यक्तीने 2019 मध्ये महिलांच्या पॅन्टीज 8 जोड्या चोरी करण्यासाठी 100 किमी लांब प्रवास केल्याबद्दल व्हायरल झाला होता.

न्यूझीलंडच्या माणसाने नेटिझन्स आणि स्थानिक अधिकाऱ्यांना चक्रावून टाकले होते.  महिलांच्या अंडरवेअर गोळा करण्याच्या त्याच्या विचित्र छंदामुळे सर्वांना धक्का बसला. त्याने 6 एप्रिल रोजी महिनो ते डुनेडिन हे १०० किलोमीटरचे अंतर  महिलांच्या पॅन्टीजच्या 8 जोड्या चोरण्यासाठी कापले. पण जेव्हा त्याने ड्युनेडिन जिल्हा न्यायालयात घरफोडीचा आरोप कबूल केला, तेव्हा त्याने सांगितले की, हा प्रवास त्याने घरफोडी करण्यासाठी केलेला नव्हता. 

अहवालांनुसार, तो उघड्या खिडकीतून घरात आला आणि त्याने 8 जोड्या पँन्टीज चोरल्या. पण तेवढ्यात तो पकडला गेला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी