[VIDEO] बंदुका घेऊन भाजप आमदाराचा डिस्को डान्स

BJP MLA Video Viral: उत्तराखंडच्या खानपुर मतदार संघातले भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांना बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका धरला आहे. 

BJP MLA Pranav Champion
[VIDEO] बंदुका घेऊन भाजप आमदाराचा डिस्को डान्स  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल
  • व्हिडिओत असभ्य भाषेचा वापर
  • ४-४ बंदुका घेऊन आमदाराचा डान्स

मुंबईः भाजपचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले चॅम्पियन पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रणव सिंह चॅम्पियन यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत ते बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी चॅम्पियन यांच्या हातात दारूनं भरलेला ग्लास देखील आहे. चॅम्पियन हे उत्तराखंडच्या खानपुरच्या मतदारसंघातले आमदार आहेत. या व्हिडिओत बघू शकतो की, चॅम्पियन यांच्या हातात बंदुका सुद्धा आहेत. दारूच्या नशेत ते डान्स देखील करत आहेत. 

या व्हिडिओमध्ये चॅम्पियन यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. जवळपास दोन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत प्रणव चॅम्पियन हे हातात बंदूक आणि मोठी हत्यारं हातात घेऊन फिरकवताना दिसत आहेत. प्रणव सिंह चॅम्पियन यांनी आपल्या काही समर्थकांसोबत पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी पार्टीत लांबा लांबा घूंघट काहे को डाला हे गाणं सुरू आहे आणि यावेळी चॅम्पियन यांच्या एका हातात दारूचा ग्लास आणि एका हातात ४- ४ बंदुका आहेत. दारूचा ग्लास आणि बंदुका घेऊन डान्स करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

प्रणव सिंह चॅम्पियन यांची वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी एका पत्रकाराला धमकावल्याच्या आरोपामुळे चॅम्पियन यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. तीन महिन्यांसाठी   याआधीही ते आपल्या नको त्या कारनाम्यांमुळे नेहमीच हेडलाईन्समध्ये असतात. या व्हिडिओ प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यासोबत आणखीही काही लोकं आहेत जे त्यांच्यासोबत डान्स करत आहेत. 

bjp mla pranav singh champion dancing with guns

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणाची चौकशी करणार असून व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बंदुकांचं आमदाराकडे लायन्सस आहे की नाही.  दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबतीची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रणव सिंह चॅम्पियन ही पार्टी आपल्या खासगी समारंभात किंवा कोणत्या सार्वजनिक जागेवर करत आहेत याबाबत देखील काही माहिती मिळालेली नाही. 

bjp mla pranav singh champion dancing with guns

या वादाच्या आधीसुद्धा चॅम्पियन आपल्या वागणुकीमुळे चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका पत्रकाराला धमकी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ लक्षात घेऊन  भाजपने त्यांना पक्षातून अनुशासनासाठी निलंबित केलं होतं. आपल्या आमदाराचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप त्यांच्यावर काय कारवाई करेल की नाही हे बघावं लागेल. 

चॅम्पियन यांच्या या व्हिडिओवर भाजपनं प्रतिक्रीया दिली आहे. भाजपच्या मीडिया सेलचे अनिल बलून यांनी म्हटलं की, मी चॅम्पियन यांचा व्हिडिओ पाहिला. मी त्यांचा निषेध करतो. चॅम्पियन यांच्याविरोधात अशाप्रकारच्या तक्रारी यापूर्वीही देखील आल्या आहेत.

या तक्रारींवर कारवाई करत त्यांना याआधीच पक्षातून तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. आम्ही उत्तराखंड युनिटशी याबाबत बातचीत करणार आहोत. चॅम्पियन यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] बंदुका घेऊन भाजप आमदाराचा डिस्को डान्स Description: BJP MLA Video Viral: उत्तराखंडच्या खानपुर मतदार संघातले भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांना बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका धरला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola