Wild Viral Video : मुंबई : एखाद्या प्राण्यामागे वाघ, बिबट्या मागे लागणे, त्यांनी या प्राण्याचे लचके तोडणे असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. परंतु रानडुकरांनी एका बिबट्याचे लचके तोडले आहेत. ही सांगोवांगी घटना नसून या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाल आहे. शिकारच खुद्द शिकार झाल्याचे दिसत आहे.
ट्विटवर @WildLense_India युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तमिळनाडूच्या पलानी भागातील कोडईकनाल मार्गावर हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एका रस्ते अपघातात बिबट्या जखमी झाला असून रान डुकरांच्या एका कळपाने या बिबट्यावर हल्ला केला आहे. बिबट्या जखमी झाला असून रानडुक्कर बिबट्याचे लचके तोडत आहेत, यावेळी बिबट्या तडफडतानाही दिसत आहे.
Disturbing Visuals
— WildLense® Eco Foundation 🇮🇳 (@WildLense_India) May 5, 2022
Claimed to be from Palani to Kodaikanal road. Probable reason might be RTA. pic.twitter.com/z79BNm4lsZ
या व्हिडीओमध्ये हे हिंसक दृश्य कैद झाली आहेत. रानडुक्कर या बिबट्याचे लचके तोडत आहेत. यावेळी ट्रॅफिक जॅम झाला असून एक ड्रायव्हर हॉर्न वाजवून या रानडुकरांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. पण रानडुक्कर अधिक हिंसक होऊन बिबट्यावर तुटून पडत आहेत.
The power of #WildBoar ! This is a graphic video where the 3 wild boar brought down a leopard. #IndiAves #IndiWild #prey #predator pic.twitter.com/GnP6FdEhvF
— RDx (@rdrakesh) May 5, 2022