Viral Video: एकाच क्षेत्रातील तरुण आणि तरुणी अनेकदा विवाहबंधनात (Marriage) अडकणे पसंत करतात. एकमेकांसमोर असलेल्या व्यावसायिक आव्हानांची (Professional challenges) त्यांना कल्पना असते आणि त्या मुद्द्यावरून त्यांची अंडरस्टँडिंग व्यवस्थित राहते, असं मानलं जातं. एकाच व्यवसायातील दोन व्यक्तींचे एकमेकांची लग्न होत असेल, तर त्या व्यवसायाशी संबंधित काही ना काही त्या लग्नात घडत असल्याचे दिसतं. म्हणजेच दोन गायकांचे लग्न होत असेल, तर त्या लग्नात गाण्याचा कार्यक्रम हमखास ठेवला जातो. किंवा दोन डान्सरचे लग्न असेल, तर हमखास नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. मात्र दोन बॉडी बिल्डरचे लग्न असेल तर काय, हा प्रश्न मजेशीर आहे. दोन बॉडी बिल्डर च्या लग्नाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकमेकांसोबत लग्नाच्या बेडीत अडकताना हे दोघेही आपापली ताकद दाखवण्याचा उत्साह आवरू शकले नाहीत. अत्यंत मजेशीर असणार हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू फुटत आहे.
हा व्हिडिओ पाश्चिमात्य देशातील असल्याचे दिसते. व्हिडिओच्या सुरुवातीला एक लग्न सुरू असून त्यामध्ये पाहुणे मंडळी जमल्याचे दिसते. त्यानंतर कॅमेरा स्टेजवरील प्रसंग दाखवतो. तिथे वर आणि वधु दोघांनीही आपापल्या हातात वजन उचललेले दिसते. लग्न सुरू असताना एवढे भलेमोठे वजन हातात घेऊन वर आणि वधू नेमके काय करत आहेत, असा प्रश्न सुरुवातीला पडतो. मात्र ते एकमेकांशी हेल्दी कॉम्पिटिशन करत असल्याचे लवकरच स्पष्ट होते.
स्टेजवर वर आणि वधू एकमेकांसमोर उभे आहेत. त्यांच्या हातात वजने आहेत आणि ते एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. जड वजन उचलून ते पॉवर लिफ्टिंग करताना दिसतात. एकमेकांसोबत स्पर्धा करत कोण अधिक वेळात ते वजन उचलते, याची मजेशीर चुरस सुरू असल्याचे दिसते. आजूबाजूला जमलेले लोक टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसते. वजन उचलून काही राऊंड मारल्यानंतर ते दोघेही वजन एका जागी स्थिर करतात आणि आपली ही ऍक्टिव्हिटी थांबवतात.
अधिक वाचा - चोरी करायला गेला अन् दरवाजात अडकला, जागेवरच तडफडून मृत्यू
लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही गंभीर असतात तर काही अतिशय मजेशीर असतात. काही काल्पनिक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतात. त्यामधील घटना सत्य नसून काल्पनिक असतात आणि त्याचे नाट्यरूपांतर करण्यात आलेले असते. मात्र सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खरा असून आजूबाजूला जमलेली मंडळी या प्रकाराचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. या प्रकाराचा ऑनलाईन आनंदही लाखो मंडळी लुटत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओवर सध्या लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत असून तो जोरदार व्हायरल होत आहे.