जन्माष्टमीला जन्मला मुलगा, मुस्लिम व्यक्तीने ठेवले नाव कृष्ण 

इंदूरमध्ये सामाजिक सलोख्याचे एक अनोखे चित्र पाहायला मिळाले आहे. एका मुस्लिम व्यक्तीने जन्माष्टमी म्हणजे कृष्णजन्माच्या दिवशी जन्मलेल्या आपल्या बाळाचे नाव कृष्ण ठेवले. 

muslim man named his son krishna
जन्माष्टमीला जन्मला मुलगा, मुस्लिम व्यक्तीने ठेवले नाव कृष्ण  

थोडं पण कामाचं

  • समाजात राजकीय आमिषांना बळी पडून धर्माच्या नावावर दंगली होत असतील पण आजही या देशात हिंदू मुस्लिम सलोखा कायम आहे.
  • भारताची समृद्ध परंपरा आणि संस्कृती हे सुंदर चित्रण जगापेक्षा भारताला वेगळे बनवत आहे. 
  • इंदूरमधील एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या मुलाचे नाव कृष्ण ठेवले आहे.

इंदूर :  समाजात राजकीय आमिषांना बळी पडून धर्माच्या नावावर दंगली होत असतील पण आजही या देशात हिंदू मुस्लिम सलोखा कायम आहे. याचे पुरावे वेळोवेळी आपल्या पाहायला मिळतात. भारताची समृद्ध परंपरा आणि संस्कृती हे सुंदर चित्रण जगापेक्षा भारताला वेगळे बनवत आहे. 

इंदूरमधील एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या मुलाचे नाव कृष्ण ठेवले आहे. या व्यक्तीचा मुलगा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जन्मला होता. यासाठी त्याने आपल्या मुलाचे नाव कृष्ण ठेवले आहे. हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई आहे भाई भाई ही केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्षात ही गोष्ट समोर आली आहे. ही अजीज खान  या व्यक्तीने खरी करून दाखवली आहे. 

मध्य प्रदेशातील अजीज खान याना १२ वर्षांपूर्वी एक मुलगा झाला. जो कृष्ण जन्माच्या दिवशी झाला. श्री कृष्णाच्या जन्माच्या दिवशी आपल्या मुलाचा जन्म झाला त्यामुळे त्यांनी त्याचे नाव कृष्ण ठेवले. अजीज खान सांगतात, सुरूवातीला त्याचे कुटुंबिया या निर्णयाच्या विरूद्ध होते. पण नंतर त्यांनी सहमती दर्शवली. 

१२ वर्षांपू्र्वी २३ ऑगस्ट २००८ मध्ये माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला.  तेव्हा डॉक्टराने फॉर्म भरताना मुलाचे नाव विचारले. तेव्हा मी त्वरित आपल्या मुलाचे नाव कृष्ण सांगितले. त्या वर्षी २३ तारखेला कृष्ण जन्माष्टमी होती. त्याच्या आईने यावर खूप विरोध केला. पण मी त्याचे नाव बदलले नाही. असे नाव ठेवायला डॉक्टरांनीही मला हटकले. पण त्यावेळी मी डॉक्टरांना सांगितले की  मुलाचे नाव ठेवण्याचा अधिकार वडिलांना असतो. त्यामुळे मी हेच नाव ठेवणार आहे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी