Video: मुंबई लोकलमध्ये स्कर्ट घालून मुलाने केला कॅटवॉक, प्रवाशांना बघायला मिळाला लाइव्ह फॅशन शो

व्हायरल झालं जी
Updated Mar 20, 2023 | 20:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Skirt Viral Video: इंस्टाग्रामवर रील बनवण्यासाठी लोक काय करतील याचा अंदाज तुम्ही किंवा आम्ही लावूही शकत नाही. अलीकडेच एक मुलगी दिल्ली मेट्रोमध्ये मंजुलिका म्हणून लोकांना घाबरवताना दिसली. आता यामध्ये मुंबई कशी मागे राहणार. सध्या मुंबई लोकलमध्ये एक मुलगा मुलींसारखा स्कर्ट घालून रील बनवताना दिसत आहे.

मुंबई लोकलमध्ये स्कर्ट घालून मुलाने केला कॅटवॉक
Boy in Skirt Viral Video in mumbai local train  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दिल्ली मेट्रोमध्ये मंजुलिका
  • मुंबई लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ
  • मुंबई लोकलमध्ये कॅटवॉक करताना

Boy in Skirt Viral Video: इंस्टाग्रामवर रील बनवण्यासाठी लोक काय करतील याचा अंदाज तुम्ही किंवा आम्ही लावूही शकत नाही. अलीकडेच एक मुलगी दिल्ली मेट्रोमध्ये मंजुलिका म्हणून लोकांना घाबरवताना दिसली. आता यामध्ये मुंबई कशी मागे राहणार. सध्या मुंबई लोकलमध्ये एक मुलगा मुलींसारखा स्कर्ट घालून रील बनवताना दिसत आहे. यावेळी प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या. अनेक प्रवासी तोंड उघडून या तरुणाकडे बघत आहेत आणि हा मुलगा बिनधास्त रिल्स बनवताना दिसत आहे. शिवम भारद्वाज असे या तरुणाचे नाव आहे.

अधिक वाचा:  VIDEO: मुंबईच्या ताज हॉटेलचे बिल भरलं चिल्लर देऊन; वाचा काय आहे प्रकरण

शिवम भारद्वाज सोशल मीडियावर 'द गाय इन अ स्कर्ट' नावाने खूप लोकप्रिय आहे. तो एक फॅशन ब्लॉगर आहे. त्याच्या या हटके रिल्समुळे तो दररोज व्हायरल होत असतो. तो ज्या प्रकारचा गेटअप घालतो आणि ज्या प्रकारचा मेकअप करतो त्यावरून अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याला पाहून सगळेच गोंधळून जातात. कधीकधी लोकांना वाटतं की शिवम हा मुलगा नसून मुलगी आहे. या व्हिडिओतही मुंबई लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडताना दिसत आहे. चला व्हिडिओ बघूया आणि जाणून घेवूया शिवमच नवा फॅशन ट्रेंड.

अधिक वाचा: Viral Video : महाकाय अजगर नट-बोल्ट सारखं गोल करत चढला झाडावर , व्हिडिओ पाहून थक्क व्हाल 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिवम काळ्या रंगाचा स्कर्ट घालून मुंबई लोकलमध्ये कॅटवॉक करताना दिसत आहे. यादरम्यान बॅकग्राऊंडमध्ये 'तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करे' या गाण्याचे संगीत ऐकू येते. शिवम फ्लोय स्कर्ट आणि सनग्लासेस घातलेला दिसत आहे. प्रवासी त्यांच्याकडे बघू लागतात. बरेच लोक आपल्या फोनचा कॅमेरा चालू करतात आणि त्यांचे व्हिडिओ बनवू लागतात. महिलांच्या कपड्यांकडे दिसत असलेल्या या मुलाला त्याच्या घरातून हाकलून देण्यात आले होते. आता मोठ्या संघर्षानंतर शिवमने मुंबईत आपला ठसा आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी