Viral: बॉयफ्रेंडने ठेवले इतर महिलांशी संबंध; गर्लफ्रेंडने नकली HR बनून शिकवला चांगलाच धडा  

व्हायरल झालं जी
Updated Apr 16, 2022 | 11:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viarl News | प्रेमात जर कोणाला धोका मिळाला तर ती संबंधित व्यक्ती हताश होऊन तुटून जाते किंवा सगळं काही विसरून पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरूवात करते. मात्र काही लोक यापेक्षाही वेगळा मार्ग निवडतात. तो मार्ग म्हणजे बदला घेण्याचा मार्ग.

Boyfriend kept in touch with other women Girlfriend became a fake HR and taught a good lesson
गर्लफ्रेंडने नकली HR बनून बॉयफ्रेंडला शिकवला चांगलाच धडा    |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गर्लफ्रेंडने नकली HR बनून बॉयफ्रेंडला शिकवला चांगलाच धडा .
  • कायला असं बदला घेणाऱ्या महिलेचे नाव आहे.
  • महिलेने टिकटॉकवरून दिली बदल्याची माहिती.

Viarl News | मुंबई : प्रेमात जर कोणाला धोका मिळाला तर ती संबंधित व्यक्ती हताश होऊन तुटून जाते किंवा सगळं काही विसरून पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरूवात करते. मात्र काही लोक यापेक्षाही वेगळा मार्ग निवडतात. तो मार्ग म्हणजे बदला घेण्याचा मार्ग. अनेकदा लोकांना जेव्हा रिलेशनशिपमध्ये धोका मिळतो तेव्हा ते बदला घेण्याचा मार्ग निवडतात. लक्षणीय बाब म्हणजे या रागामध्ये त्यांना हे देखील समजत नाही की त्यांनी निवडलेला मार्ग बरोबर आहे की चुकीचा. अलीकडेच असेच काहीसे एका महिलेने (Woman Took Revenge From) केले आहे. (Boyfriend kept in touch with other women Girlfriend became a fake HR and taught a good lesson). 

अधिक वाचा : रणबीर-आलियाच्या लग्नावरुन Durex कंडोमची फनी पोस्ट

डेली स्टारच्या वृत्तानुसार, कायला (Kaylah) नावाच्या महिलेने सोशल मीडिया साइट टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लोकांना तिच्या माजी प्रियकर आणि पूर्वीच्या नात्यातील वेदनांबद्दल माहिती दिली, ज्याबद्दल लोकांना हे जाणून धक्का बसला. परंतु जेव्हा तिने बदला कसा घेतला हे सांगितले तेव्हा अनेकांनी तिला विचारणा केली आणि त्या महिलेचे कौतुक केले. 

महिलेने टिकटॉकवरून दिली बदल्याची माहिती

कायलाने म्हटले की, जेव्हा तिला समजले की तिच्या बॉयफ्रेंडचे आणखी एका महिलेशी अफेयर सुरू आहे तेव्हा तिने त्याला सोडून दिले आणि बदला घेण्याचे ठरवले. कायलाने खूप विचार करून बदला घेण्याचा प्लॅन ठरवला. यासाठी तिने बनावट एचआर (HR) बनून बॉयफ्रेंडशी संपर्क साधला आणि तब्बल एक महिना नोकरीची प्रोसेस करत राहिली. लक्षणीय बाब म्हणजे बॉयफ्रेंडला देखील वाटले की नोकरी बदलणार आहे त्यासाठी तो पण या प्रोसेसमध्ये सहभागी झाला. एका महिन्यानंतर तिने तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडला नोकरीसाठी नकार दिला आणि एक अतिशय वाईट नकार देणारा मेल केला ज्यामध्ये तिने सांगितले की तो एक अपात्र उमेदवार आहे आणि त्याचा सीव्ही देखील खराब आहे. 

लोकांना केला महिलेला सपोर्ट

महिलेची ही आयडिया पाहून अनेक महिलांनी या महिलेचे कौतुक केले आहे. एका महिलेने म्हटले की, हे पाहून कायला माझ्यासाठी हिरो बनली आहे. तर काहींनी तिचा क्विन म्हणून उल्लेख केला आहे. तर काहींनी लिहले की, बदला घेण्याच्या कायलाच्या युक्तीने तिने सर्वांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तर काही युजर्संनी काही सल्ले देखील दिले आहेत. त्या संबंधित व्यक्तीचा सीव्ही अपात्र ठरवण्यापेक्षा त्याला आहे त्या नोकरी वरून देखील काढून टाकायला हवे होते असे त्यांनी म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी