लग्नापूर्वी गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच बॉयफ्रेंडने केलं असं काही की...., ऐकल्यावर तुम्हालाही बसेल धक्का

Viral News: परीक्षेत आपली गर्लफ्रेंड नापास झाल्यानंतर तिच्या प्रियकराने असं काही पाऊल उचललं जे ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाल्याने बॉयफ्रेंड संतापला
  • रागाच्या भरात बॉयफ्रेंडने घेतला टोकाचा निर्णय
  • या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी केली अटक

Trending news: प्रेमात तरुण-तरुणी काय करतील याचा काहीही अंदाज वर्तवला जाऊ शकत नाही. प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रेयसी परीक्षेत नापास झाल्याने एका तरुणाने असं काही कृत्य केलं जे ऐकल्यावर सर्वांनाच धक्का बसला. (boyfriend set on fire to college after his girlfriend fail in the examination)

प्रेमात माणसं जीव देतात असं म्हटलं जातं. इतकेच नाही तर काहीजण प्रेमासाठी असं काही करतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. आता असाच काहीसा प्रकार इजिप्तमधून समोर आला आहे. येथील एका तरुणाची गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाली आणि त्यानंतर त्याने कॉलेजमध्ये जे काही केलं त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.

रिपोर्ट्सनुसार, Menoufia प्रांतात राहणाऱ्या एका तरुणाची गर्लफ्रेंड शिक्षण घेत आहे. या दोघांचा साखरपुडाही झाला आहे. काली काळानंतर या दोघांचा विवाह सुद्धा होणार आहे. मात्र, विवाहापूर्वी या तरुणीची कॉलेजमध्ये एक परीक्षा झाली आणि त्या परीक्षेत तरुणी नापास झाली. आपली गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाल्याचं कळताच हा बॉयफ्रेंड नाराज झाला.

अधिक वाचा : Dangerous Stunt : इन्स्टाग्रामवर गाजतोय ‘खतरों का खिलाडी’, स्टंट पाहून लावाला डोक्याला हात

आपली गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाल्याचं घरी कळालं तर लग्न पुढे ढकलले जाईल अशी भीती या तरुणाला होती. या भीतीने या तरुणाने चक्क कॉलेजलाच आग लावली. कॉलेजला आग लावल्याने तेथील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अनेक कागदपत्रेही जळाली आहेत. कॉलेजला आग लागल्याची माहिती सर्वत्र पसरली आणि एकच खळबळ उडाली. या घटनेची माहितीही तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली आणि त्यानंतर ही आग विझवण्यात आली.

बॉयफ्रेंडच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती उघड

कॉलेजला आग लावल्यावर हा तरुण पळून गेला आणि आपल्या गावात लपला होता. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती उघड झाली आणि ती म्हणजे प्रेयसी नापास झाल्याने त्याने कॉलेजला आग लावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी