Viral video: बाईक क्रॉस करण्यासाठी या मुलांनी लावली अशी शक्कल, तुम्ही देखील घालाल दंडवत

व्हायरल झालं जी
Updated Apr 05, 2023 | 15:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Video इंस्टाग्राम वर व्हायरल होत असलेल्या एका व्हीडियोमध्ये दोन मुल बंद गेट वरून आपली बाईक क्रॉस करताना दिसून येत आहेत, या मुलांनी एका सुपरमॅनप्रमाणे बाईक उचलून गेटच्या पलीकडे ठेवली, बंद गेटच्या पलीकडे बाइक घेऊन जाणारा हा देसी जुगाड पाहून तुम्ही देखील थक्क होऊन जाल.  पद्धत पाहता तुम्ही थक्क होऊन जाल. पहा गंमतीदार व्हीडियो- 

व्हायरल व्हिडिओ 
बाईक क्रॉस करतानाचा हा मजेशीर व्हीडियो   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • बंद गेटच्या पलीकडे या मुलांनी केली बाईक क्रॉस
  • बाईक चक्क उचलून केली पार
  • पहा हा मजेशीर व्हीडियो

Desi Jugad to cross the scooter on Gate Viral Video  सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रील्स दररोज अपडेट होत असतात. मात्र कधीतरी असा एखादा भन्नाट व्हीडियो येतो, की तो पाहिल्यावर आपण केवळ हसत बसतो, आणि वारंवार पाहत राहतो.  (boys used desi jugaad to cross the scooter on gate video goes viral). 

अधिक वाचा : ​मुंबईकरांना आनंदवार्ता; 33690 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

असाच एक व्हीडियो इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, रात्रीच्या वेळी दोन मुले स्कूटरने कुठेतरी जात असताना आपल्याला दिसतात, मात्र समोरचा गेट बंद आहे. अशावेळी तुम्ही काय केले असते? तुम्ही तिथून परत निघाला असता किंवा अजून दुसरे कुठे गेट उघडे आहे का हे पाहिले असते. मात्र, या मुलांनी तसे काही केले नाही. या मुलांनी गेटवरुन बाईक घेऊन जाण्याची शक्कल लढवली.

या दोघांनी त्यांची बाईक चक्क उचलली आणि गेटच्या दुसऱ्या बाजूला ठेवली! असे करताना त्यांची बाइक गेटच्या दुसऱ्या बाजूला कलंडली.  मग, त्या पैकी एकाने दुसऱ्या बाजूला उडी टाकत कलंडलेली बाईक उचलून सरळ केली. अशा रीतीने ही मुले गेटच्या पलीकडे जाऊन बाईकवर पुन्हा स्वार होऊन प्रवासाला निघाली! हा किस्सा ऐकायलाच इतका गंमतीदार आहे तर हा ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला किती मज्जा येईल हे तुम्हीच ठरवा.

पहा हा मजेशीर व्हिडिओ. 

 

अधिक वाचा : ATM मशीनमध्ये हिरव्या रंगाची लाईट का असते?

बाइक पार करण्याचा हा मजेदार व्हिडिओ व्हायरल

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने उपरोधिकपणे म्हंटले आहे की, जेव्हा घरातून वडिलांचा फोन येतो तेव्हा लोक असेच करतात. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, 'भावाने देसी जुगाड वापरला.' या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच तो अनेकदा शेअर देखील करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 'princeyadav16py' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी