ब्रा मध्ये महिलेने लपवून ठेवला होता कॅमेरा, पाहा काय आहे कारण...

व्हायरल झालं जी
Updated Oct 25, 2019 | 20:36 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Woman wears hidden camera: महिलांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन कसा आहे, त्यांचे विचार कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी एक रिअॅलिटी चेक करण्यात आला. पाहूयात या एक्सपीरिमेंटमध्ये काय आलं समोर...

bra spy camera woman cancer awareness news in marathi
ब्रा मध्ये महिलेने लपवून ठेवला होता कॅमेरा, पाहा काय आहे कारण... 

नवी दिल्ली: महिलांच्या बाबतीत पुरुषांचे विचार भलेही बदलले असतील मात्र, आजही काहीजण महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहतात. महिलांकडे पाहण्याची त्यांची नजर सांगत असते की त्यांच्या मनात काय सुरु आहे. याच संदर्भात एका महिलेने एक्सपीरिमेंट केलं आणि त्यानंतर असं काही समोर आलं जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
न्यूयॉर्कमध्ये एका महिलेने आपल्या 'ब्रा'मध्ये एक मिनी कॅमेरा लपवला होता. त्या मागचं कारण म्हणजे या महिलेला जाणून घ्यायचं होतं की, दैनंदिन आयुष्यात वावरताना किती जण आपल्या ब्रेस्टकडे पाहतात. यानंतर मिनी कॅमेऱ्यात जे फुटेज रेकॉर्ड झालं ते पाहून महिलेलाही धक्का बसला.

मिनी कॅमेऱ्यात जे फुटेज समोर आलं त्यात मोठ्या संख्येत नागरिकांच्या नजरा कैद झाल्या होत्या जे त्या महिलेच्या ब्रेस्टकडे पाहत होते. यामध्ये केवळ पुरुषच नाही तर महिलांचाही समावेश होता. इतकचं नाही तर कुत्रा आणि काही प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा होत्या ज्या विचित्र नजरेने तिच्या ब्रेस्टकडे पाहत होते. हा एक्सपीरिमेंट करण्यामागे तिचा उद्देश कुमालाही चुकीचं ठरवणं असा नव्हता. तर ब्रेस्ट कॅन्सर सारख्या विषयावर नागरिकांमध्ये जागरुकता पसरवणं असा उद्देश होता. 

या महिलेचं माननं आहे की, जितकेजण महिलांच्या ब्रेस्टकडे पाहतील ते महिलांना वारंवार आठवण करुन देतील की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जागरुक राहून चेक अप करणं गरजेचं आहे. या महिलेने स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला असं करणं माझ्यासाठी खूपच विचित्र आणि अवघड असल्याचं वाटत होतं पण वास्तविक पाहता हे करणं खूपच महत्वाचं होतं.

या महिलेने सांगितले की, केवळ पुरुषच नाही तर महिलाही त्याच प्रमाणे वागतात. हा अनुभव खूपच वेगळा आणि फनी होता. हा व्हिडिओ पाहून जर एखादी महिला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ओळखून सेल्फ चेक अप करेल तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. हा एक्सपीरिमेंट कुणाचाही अपमान करण्यासाठी नाही तर चांगल्या उद्देशाने केला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी