Viral Video : आयफेल टॉवरसमोर तरुणींनी काढले कपडे...व्हिडिओ झाला जबरदस्त व्हायरल, पाहा व्हिडिओ

Eiffel Tower Viral Video : फ्रान्समधील पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर (Eiffel Tower) ब्राझीलच्या दोन महिला मॉडेलने कपडे काढल्याने गोंधळ झाला. झाले असे की एक व्हिडिओ समोर आला आहे. या दोन्ही मॉडेल कपडे काढून बिकिनीमध्ये (Brazil Bikini Models) दिसत आहेत. या व्हिडिओने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यावर एकच धमाल उडाली. सोशल मीडियावर या व्हिडिओसंदर्भात कॉमेंट्सचा पाऊस पडला असून युजर्सनी या दोघींना चांगलेच टार्गेट केले आहे.

Viral Video
व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • आयफेल टॉवरसमोरील व्हिडिओ व्हायरल
  • ब्राझिलच्या मॉडेल आल्या बिकिनीमध्ये
  • सर्वांसमोर बिकिनीमध्ये बनवला व्हिडिओ

Women stripping off in front of Eiffel Tower : नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. मग ती एखादी घटना असो, बातमी असो की व्हिडिओ. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होतो आहे. हा व्हिडिओ आहे आयफेल टॉवरसमोरचा. फ्रान्समधील पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर (Eiffel Tower) ब्राझीलच्या दोन महिला मॉडेलने कपडे काढल्याने गोंधळ झाला. झाले असे की एक व्हिडिओ समोर आला आहे. या दोन्ही मॉडेल कपडे काढून बिकिनीमध्ये (Brazil Bikini Models) दिसत आहेत. या व्हिडिओ फुटेजमध्ये अर्धनग्न दिसल्यानंतर पॅरीस पोलीस अधिकाऱ्यांनी 24 वर्षीय गॅब्रिएला व्हर्सियानी आणि 27 वर्षीय गॅबिली यांच्याशीही संपर्क साधला आहे.  या दोघींनी नेमके काय केले ते जाणून घेऊया. (Brazil model having bikini shoot at Eiffel Tower goes viral)

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रात्री राज्यात, असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम

ब्राझिलच्या मॉडेल

त्याचे झाले असे की ब्राझिलच्या या दोन मॉडेल्स त्यांच्या बिकिनी व्यवसायाच्या जाहिरातीसाठी पॅरीसच्या आयफेल टॉवरवर गेल्या होत्या. त्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यावर एकच धमाल उडाली. सोशल मीडियावर या व्हिडिओसंदर्भात कॉमेंट्सचा पाऊस पडला असून युजर्सनी या दोघींना चांगलेच टार्गेट केले आहे. 

अधिक वाचा : Bank Strike Update: पुढील आठवड्यात देशभरात बँक संप, एटीएमसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

बिकिनीमध्ये आयफेल टॉवरसमोर

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही मॉडेलने लांब काळा कोट परिधान केला आहे. यानंतर या दोघी आयफेल टॉवरसमोर शूट करताना हे कोट काढतात आणि शेवटी त्या लाल बिकिनीमध्ये दिसतात. त्यांच्या बिकिनी प्रदर्शनामुळे  त्यांच्याभोवती मोठा जनसमुदाय जमा झाला आणि दूरदूरवरून लोक त्यांना पाहण्यासाठी येऊ लागले. हा सर्व गोंधळ पाहिल्यानंतर तेथील काही पोलिसही पुढे आले आणि त्यांनी या मॉडेल स्वतःला झाकण्याच्या सूचना केल्या.

व्हेनेसा लोपेझ नावाच्या महिलेने या संपूर्ण प्रकाराबद्दल सांगितले आहे. तिला जवळजवळ अटक झाली कारण ती बिकिनीची जाहिरात करत होती.अशा प्रकारे बिकिनीची जाहिरात करण्यास मनाई असल्याचे तिला सांगण्यात आले. यावरून तिची आणि पोलिसांची चर्चा झाली. यानंतर ती पोलिसांना समजावून सांगण्यासाठी गेली असता पोलिस अधिकाऱ्यांनी हे नियमांच्या विरोधात असून तुम्ही पर्यटन स्थळी अर्धनग्न फोटो काढू शकत नाही, अशी समज या मॉडेलला दिली.

अधिक वाचा : Mumbai-Goa महामार्गावर कशेडी घाटात भीषण अपघात; रिक्षा चालकासह तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

युजर्सच्या कॉमेंट्स

सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाला असून युजर्स यावर तुफान प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या मॉडेलला धारेवर धरले आहे. काहींनी याला लज्जास्पद म्हटले असून महिलांनी सीमा ओलांडल्याचे म्हटले आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, "मला समजत नाही की तिला तिच्या बिकिनी ब्रँडचा प्रचार करायचा असेल तर ती पूलमध्ये का गेली नाही. शेवटी, तिने पॅरिसमधील आयफेल टॉवर का निवडला." तर दुसऱ्या बाजूला काही युजर्सनी या मॉडेलचे समर्थन देखील केले आहे. आपणदेखील बिकिनी घालून असेच केले असते असे त्यांनी म्हटले आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी