Viral Video: भर लग्नाच्या मंडपात झाली वधू-वराची तुंबळ हाणामारी, मग पुढे काय झाले जाणून घ्या

व्हायरल झालं जी
Pooja Vichare
Updated Aug 10, 2022 | 16:25 IST

Wedding Viral Video:यावेळी इंटरनेटवर घबराट निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लग्नाच्या विधीशी (wedding ceremony)संबंधित आहे.

Viral Video
व्हायरल व्हिडिओ 
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर (Social Media) दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात.
  • सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नातेवाईक नाहीतर वधू-वर भांडताना दिसत आहेत.
  • विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे वधू-वर आपापल्या लग्नात का भांडत आहेत?

मुंबई:  Bride and Groom fight Wedding Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी सर्वात जास्त व्हायरल झालेले व्हिडिओ हे लग्नातील मौजमजेचे (wedding fun)असतात. मात्र, यावेळी इंटरनेटवर घबराट निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लग्नाच्या विधीशी (wedding ceremony)संबंधित आहे. आतापर्यंत लग्नाच्या वरातीतील डान्स तुम्ही पाहिलाच असेल, वधूची धमाकेदार( wedding dance) एन्ट्री तुम्ही पाहिली असेलच पण या व्हिडिओमध्ये जे काही बघायला मिळत आहे. ते तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिलं नसेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नातेवाईक नाहीतर वधू-वर भांडताना दिसत आहेत. भरमंडपात दोघांची कुस्ती बघायला मिळतेय.

विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे वधू-वर आपापल्या लग्नात का भांडत आहेत? जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि त्यामागचे कारण.

अधिक वाचा- उद्या रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा 200 वर्षांनंतर आलाय 'असा' भन्नाट
 
लग्नादरम्यान वधू-वर मंडपात बसून सर्व विधी पार पाडतात, मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वेगळंच काही दिसतंय. विधी करण्यासाठी वधू वराच्या दिशेनं हात पुढे करते. यानंतर वर त्याची मान हलवतो. मग वधूलाही राग येतो आणि दोघांमध्ये भांडण सुरू होते. आजूबाजूचे लोक दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करतात पण तरीही ते थांबत नाहीत. मात्र, भांडणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा व्हायरल व्हिडिओ लोकांना खूप हसवत आहे आणि लोक या व्हिडिओवर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

लग्न होत असताना विविध विधी केले जातात. अनेक वेळा यामध्ये काही वेगळे विधी पाहायला मिळतात. मात्र सध्या चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर लहान मुलांप्रमाणे भांडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही लग्नाच्या मंडपात हातापायी करताना दिसत आहेत. 

हजारोंनी लाईक केला व्हिडिओ 

लोकांना हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग वाटत आहे, त्यामुळे लोक सतत कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, मला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. दुसरीकडे, आणखी एका युजरने लिहिले की, मला वाटते की या दोघांनी लग्न करण्यापूर्वी पुन्हा विचार केला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी