Viral Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. इतरांच्या लग्नात सहभागी होणं, हाही तितकाच आनंदाचा भाग असतो. लग्नात सहभागी होणाऱ्या इतरांना आपला वेळ घालवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. ही मंडळी इतरांशी गप्पा मारू शकतात, सुरू असलेले विधी पाहू शकतात किंवा फारच कंटाळा आला तर हॉलमधून बाहेर पडून फेरफटकाही मारू शकतात. मात्र वधू आणि वर यांच्याकडे मात्र असा पर्याय नसतो. तासनतास चालणाऱ्या विधींमुळे अनेकदा वधू आणि वर कंटाळलेले दिसतात. आपल्या लग्नाची उत्सुकता असली तरीदेखील कित्येक तास एकाच जागी बसावं लागत असल्यामुळे अनेकांना बोअर व्हायला सुरुवात होते. अशा परिस्थितीत कधी एकदा हे विधी संपतात आणि आपण मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत मोकळेपणाने सहभागी होऊ शकतो, याची ते वाट पाहत असतात. मात्र विधी सुरू असताना मध्येच जर भटजीबुवा काही कारणाने उठून गेले, तर मिळणारा वेळ कसा सत्कारणी लावता येतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वधू आणि वर हे फेरे घेण्याच्या तयारीत बसल्याचे दिसते. लग्नाचे विधी सुरू आहेत आणि लवकरच अग्निभोवती सात फेरे घेण्याचा विधी सुरू होणार आहे, असे दिसते. मात्र तेवढ्यात काही मिनिटांसाठी भटजीबुवा तिथून निघून जातात. ही संधी साधत नवरदेव आपली करमणूक करून घ्यायला सुरुवात करतो. त्यासाठी तो जवळच असलेली पाण्याची एक छोटी बाटली उचलतो आणि ती बाटली हवेत भिरकावून सरळ उभी करण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून वधूलादेखील राहवत नाही. ती देखील त्याच्या या गेममध्ये सहभागी होते. मग दोघे मिळून हा खेळ खेळायला सुरुवात करतात.
अधिक वाचा - मा*****द : मालकाने शिव्या देऊन कामावर काढून टाकले, चालकाने असा घेतला बदला
बाटली हवेत गोल फिरवून जमिनीवर उभी करण्याची ही गेम प्रसिद्ध आहे. अनेकजण वेळ घालवण्यासाठी ही गेम खेळत असतात. काहीजणांचा याबाबतीत इतका सराव झालेला असतो, की अगदी सहजपणे ते बाटली उभी करू शकतात. मात्र या व्हिडिओत दिसणारे वर आणि वधू, हे काही या गेममध्ये सराईत असल्याचे दिसत नाही. मात्र विधीला कंटाळून विरंगुळा शोधणारे हे दोघे या गेममध्ये आपले मन रमवताना दिसतात.
अधिक वाचा - लग्नात नवरीचे ठुमके पाहून नवरदेव झाला घायाळ आणि मग... पाहा VIDEO
लग्नात अर्थातच सर्वांचे लक्ष वर आणि वधू यांच्याकडेच असतं. हे दोघे काय करत आहेत, काय विधी सुरू आहेत, दोघांनी कसे कपडे परिधान केले आहेत याकडे सर्वजण लक्ष ठेवून असतात. लग्नाच्या विधीतून ब्रेक मिळाल्यामुळे जेव्हा या दोघांनी बाटलीचा गेम सुरू केला, तेव्हा काही वऱ्हाडी मंडळींनी आपल्या कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड केली. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा दोघांचा हा प्रयत्न सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.