Viral Video: नवरदेवाने स्टेजवर केलं असं काही की संतापली नववधू अन् मग धू-धू धुतला

Groom Bride viral video: लग्नमंडपात अशी काही घटना घडली की ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नववधूच्या रुद्रावताराचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

bride beat newly wedded groom video goes viral watch it
Viral Video: नवरदेवाने स्टेजवर केलं असं काही की संतापली नववधू अन् मग धू-धू धुतला 
थोडं पण कामाचं
  • लग्नमंडपातील व्हिडिओ होतोय व्हायरल
  • संतापलेल्या नववधूने थेट नवरदेवालाच केली मारहाण

Groom beaten by bride video viral: लग्नमंडपातील विविध घटनांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. ते व्हिडिओ किंवा फोटोज पाहून चेहऱ्यावर हास्य उमटते. काही वेळा अशा काही घटना घडतात त्या पाहून हसू आवरत नाही. आता सोशल मीडियात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नववधूचा रुद्रावतार पाहून सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (bride groom video viral in social media)

व्हिडिओत दिसत आहे की, लग्न समारंभ पार पडल्यावर नववधू आणि नवरदेव हे स्टेजवर उभे आहेत. त्याच दरम्यान नवरदेव हा आपल्या नववधूला जबरदस्तीने केळे भरवताना दिसून येत आहे. मात्र, नववधूला केळे खायचं नव्हतं. तरीही नवरदेव हा जबरदस्तीने तिच्या तोंडात केळे कोंबत आहे. नवरदेवाकडून होत असलेली जबरदस्ती पाहून नववधू संतापते.

संतापलेली नववधू रागाच्या भरात नवरदेवाला मारहाण करण्यास सुरुवात करते. त्यानंतर नवरदेवही तिच्यावर हात उगारताना दिसून येत आहे. नवरदेव शांत झाल्यावर पुन्हा नववधू त्याला मारहाण करण्यास सुरुवात करते. नववधू आणि नवरदेव यांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही हे नक्कीच.

हे पण वाचा: वयाच्या 13व्या वर्षी करिना 'याच्या' प्रेमात झाली होती वेडी​

सोशल मीडियात हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा मजेदार व्हिडिओ patiale_wale_Chacha_ji नावाच्या इस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लाईक्स याला मिळाले आहेत. तर हा व्हिडिओ 1 कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहिलेल्यांपैकी एका युजरने म्हटलं, 'लग्नातही सावधान रहा, सतर्क रहा'.

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळालेली नाहीये. सोशल मीडियात व्हायरल होणारा हा व्हिडिओ एखाद्या कॉमेडी अ‍ॅक्टचा भाग असण्याची शक्यता आहे. या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी आम्ही करत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी