VIDEO: वरमाला घालताच नववधूला ह्रदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली अन्....

bride died after heart attack in marriage: लग्न समारंभात नववधूला ह्रदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

bride dies during marriage heart attack shocking video goes viral
VIDEO: वरमाला घालताच नववधूला ह्रदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली अन्.... 
थोडं पण कामाचं
  • लग्न समारंभात आनंदाचे वातावरण असताना घडला विचित्र प्रकार
  • वरमाला घालताच नववधूला आला ह्रदयविकाराचा झटका
  • स्टेजवरच चक्कर येऊन कोसळली नववधू

Heart attack to bride during marriage: लग्न समारंभ म्हटलं की, सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात एक धक्कादायक आणि विचित्र अशी घटना घडली आहे. लग्नसमारंभात नववधू आणि नवरदेव स्टेजवर एकमेकांना वरमाला घालतात. त्याच दरम्यान नववधूला ह्रदयविकाराचा झटका आला आणि ती चक्कर येऊन स्टेजवर कोसळली. (bride dies during marriage heart attack shocking video goes viral)

ही घटना लखनऊ येथील आहे. येथील मलिहाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका लग्न समारंभात ही घटना घडली. लग्नापूर्वी नववधूची प्रकृती बिघडली होती मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी लो ब्लड प्लेशर असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर लग्न विधीला पुन्हा सुरुवात झाली. लग्नसमारंभातील एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

लग्न समारंभाचे सर्व विधी सुरू झाले आणि नवरदेव-नववधूने एकमेकांना वरमाला घातल्या. वरमाला घातल्यानंतर अचानक नववधूला ह्रदयविकाराचा झटका आला आणि ती स्टेजवर कोसळली. त्यावेळी तात्काळ तिला उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगत दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले.

हे पण वाचा : लैंगिक संबंधांबाबत हे आहेत सामान्य समज-गैरसमज

कुटुंबीयांनी तात्काळ नववधूला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. लग्न समारंभातून पाठवणी ऐवजी नवधूला जगाचाच निरोप घ्यायची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली आहे. 

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती आपल्या भावना कशा प्रकारे लपवते? तुमची रास कोणती?

लखनऊ येथील मलिहाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भदवाना येथील राजपाल शर्मा यांची मुलगी शिमांगी हिचा विवाह लखनऊतील राकेश शर्मा यांचा मुलगा विवेक याच्यासोबत होता. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वाजत-गाजत नवरदेव विवेक नववधूच्या घरी दाखल झाला होता. मात्र, लग्नसमारंभात विचित्रच घटना घडली आणि सर्वत्र एकच शोककळा पसरली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी