Bride fire gun shocking incident caught in camera: लग्नातील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ हे खूपच मजेशीर असतात. आता सोशल मीडियात लग्नमंडपातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ नववधू आणि नवरदेव हे स्पार्कल गन हातात घेऊन फोटोसाठी पोझ देतात आणि त्यानंतर फायर करताच असं काही घडतं जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
स्पार्कल गनचा वापर पार्टी, लग्नात अनेक ठिकाणी होताना दिसून येतो. या गनचं ट्रिगर दाबताच त्यातून चमकणारी आग बाहेर पडते. फटाक्यातील पावसाप्रमाणे दिसणारी ही आग असते. आता सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सुद्धा नववधू आणि नवरदेव अशीच स्पार्कल गन घेऊन पोझ देतात आणि त्यानंतर फायर करतात.
Was this really needed ? — Dr Durgaprasad Hegde (@DpHegde) March 30, 2023
Too much is too bad pic.twitter.com/kAviHWSsLq
हा व्हिडिओ 13 सेकंदांचा आहे. व्हिडिओत दिसत आहे की, नवरदेव आणि नववधू स्टेजवर उभे आहेत. दोघांनीही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून पोझ देत हातात गन पकडली आहे. त्यानंतर कॅमरामन त्यांना स्पार्कल गन चालवण्यासाठी सांगतो आणि मग ते ट्रिगर दाबतात. गनचं ट्रिगर दाबताच नवरदेवाच्या गनमधून स्पार्कल फायर बाहेर येते. मात्र, नववधू जेव्हा ट्रिगर दाबते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरच सर्व स्पार्कल फायर येते.
हे पण वाचा : दररोजच्या या सवयींमुळे गळतात केस
नववधूच्या हातात असलेली स्पार्कल गन उलट दिशेने फायर होते आणि यामध्ये तिच्या चेहऱ्यावर आग येते. नववधू लगेचच स्टेजवरुन खाली उतरण्यासाठी पळते. हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, या व्हिडिओतून शिकण्यासारखं खूप काही आहे. फटाक्यांचा वापर केलेले प्रोडक्ट्स किंवा स्पार्क होणारे प्रोडक्ट्स अशा प्रकारे कोणत्याही समारंभात वापरू नयेत.
हे पण वाचा : जेवताना पाणी प्यावे की नाही? तुम्ही काय करता?
हा व्हिडिओ ट्विटरवर @DpHegde यांनी 30 मार्च रोजी पोस्ट केला होता. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलं, खरंच या सर्वांची गरज होती का? खूप वाईट झाले. सोशल मीडियात हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूव्ज मिळाले आहेत. तसेच युजर्सच्या विविध कमेंट्स सुद्धा येत आहेत.