Viral: आरारा खतरनाक! ५१ ट्रॅक्टर घेऊन नवरीला आणायला गेला नवरदेव; पाहा व्हिडीओ

व्हायरल झालं जी
Updated Jun 10, 2022 | 11:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Wedding Viral Video । देशात अद्यापही लनसराईचा सिझन सुरू आहे. यादरम्यान सोशल मीडियावर नेहमी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसायला भाग पाडतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे असतात.

bride groom went to fetch the bride with 51 tractors, Watch the video
५१ ट्रॅक्टर घेऊन नवरीला आणायला गेला नवरदेव, पाहा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशात अद्यापही लनसराईचा सिझन सुरू आहे.
  • सोशल मीडियावर नेहमी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात.
  • ५१ ट्रॅक्टर घेऊन नवरीला आणायला गेला नवरदेव.

Wedding Viral Video । मुंबई : देशात अद्यापही लनसराईचा सिझन (Wedding Season) सुरू आहे. यादरम्यान सोशल मीडियावर नेहमी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसायला भाग पाडतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे असतात. दरम्यान आज असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे आणि लोक त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. (bride groom went to fetch the bride with 51 tractors, Watch the video). 

अधिक वाचा : ओ शेठ! तुम्ही 'स्ट्रॉ'च बंद केला थेट! -'अमुल'चं PMO ला पत्र

अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा

आजकाल लग्नसोहळ्यात काहीतरी वेगळं करण्याचा ट्रेंड निघाला आहे. नवरा-नवरीपासून ते लग्नाच्या मिरवणुकीपर्यंत काहीतरी वेगळे करण्याचा सर्वजण प्रयत्न करतात. त्यामुळे त्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत असते आणि तो भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाच्या मिरवणुकीची स्टाईल पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ राजस्थानचा आहे, ज्यामध्ये नवरदेवाच्या पार्टीने लग्नामध्ये एक नवीन ट्रेंड आणला आहे. या अनोख्या लग्नात नवरदेवाला ५१ ट्रॅक्टर घेऊन मिरवणूक निघाली होती. लक्षणीय बाब म्हणजे नवरदेव स्वत: ट्रॅक्टर चालवत होता. 

ट्रॅक्टरवर वऱ्हाडी स्वार

ही अनोखी मिरवणूक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सध्या या लग्नाची सर्वत्र चर्चा होत असून या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ एएनआयने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १८ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी