Pre wedding shoot: अन् रस्त्यावरील खड्ड्यांतच नववधूने केलं प्री वेडिंग शूट, Video होतोय व्हायरल

Bride pre wedding photoshoot in potholes: लग्नापूर्वी अनेकजण प्री-वेडिंग फोटोशूट किंवा व्हिडिओशूट करतात.  असंच एक प्री-वेडिंग शूट सध्या चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामागचं कारणंही तसंच आहे.

bride pre wedding photoshoot on road potholes video goes viral must watch
Pre wedding shoot: अन् रस्त्यावरील खड्ड्यांतच नववधूने केलं प्री वेडिंग शूट, Video होतोय व्हायरल  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ होतोय व्हायरल
  • पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये केलं शूट 
  • व्हिडिओला सोशल मीडियात मिळतोय तुफान प्रतिसाद

Bride photoshoot in potholes: सध्या प्री-वेडिंग फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट करण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. लग्नापूर्वी वधू आणि नवरदेव हे एका रोमँटिक अशा ठिकाणी किंवा निसर्गरम्य ठिकाणी फोटोशूट करत असतात. अशाच प्रकारचं फोटोशूट एका नववधूने केलं आणि पाहता पाहता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होण्यामागचं कारणंही तसेच आहे. (bride pre-wedding photoshoot on road potholes video goes viral must watch)

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत प्री-वेडिंग शूट

भारतातील अनेक राज्यांत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पहायला मिळत आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या शहरात विविध समस्या उद्भवत आहेत मात्र, सर्वांनाच आपल्या समस्या मांडता येत नाहीत. केरळमधील एका नववधूने आपल्या परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्येच फोटोशूट केलं आहे.

केरळमधील नववधू आणि वेडिंग फोटोग्राफर यांनी मिळून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचलेलं पाहून त्या ठिकाणीच प्री-वेडिंग फोटोशूट करण्यास सुरुवात केली आहे. नववधूने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. ही साडी परिधान करुन नववधू चिखलाने आणि घाण पाण्याने भरलेल्या खड्ड्यांतून वाट काढत चालताना दिसून येत आहे. या प्री-वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

हे पण वाचा : पोळपाट-लाटणे खरेदी करण्यापूर्वी जरूर जाणून घ्या हे नियम

आतापर्यंत या व्हिडिओला 4 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लाल रंगाची साडी परिधान केलेल्या नववधूचे फोटोज सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ऐरो वेडिंग कंपनीने (Arrow Wedding Company)ने शेअर केला आहे. या व्हिडिओत पहायला मिळतं की, ट्रेडिशनल लूकमध्ये सजलेल्या नववधूने दागिने सुद्धा परिधान केले आहेत. त्यानंतर ही वधू रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाट काढत चालताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी