मुंबई: सध्याच्या घडीला काय बघायला मिळेल अथवा ऐकायला मिळेल याचा काही नेम नाही. अनेकदा अशी काही प्रकरणे समोर येता ज्यांच्यावर विश्वास ठेवणे खरंच कठीण असते. अशातच एक हैराणजनक बातमी समोर आली आहे ती पण इंडोनेशिया येथून. येथे लग्नाच्या दोन दिवस आधी नवरा मुलगाच फरार झाला. कारण त्याची बायको प्रेग्नंट होती. जेव्हा याबाबतचा खुलासा झाला तेव्हा हाहाकार सुरू झाला. इतकंच नव्हे तर घरच्यांनी त्या मुलीचे लग्न चाकूशी लावले आहे. दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
इंग्रजी वेबसाईट डेली मेलनुसार बालीमध्ये ही अजब घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पुतु मेलिना नावाची मुलगी एका मुलीवर प्रेम करत होती. मेलिनाने तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी कसेबसे तिच्या घरच्यांना तयार केले होते. दोन दिवसांनी तिचे लग्न होणार होते. एकीकडे या मुलाने आधीच त्या मुलीशी शारिरीक संबंध ठेवले होते. या दरम्यान समजले की मुलगी प्रेग्नंट झाली आहे. मुलाला जसे हे समजले तसे त्याने लग्नास नकार दिला आणि फरार झाला. मुलीलाही यावर विश्वास बसत नव्हता की तिचा प्रियकर अशा प्रकारे धोका देऊन पळून जाईल.
जेव्हा नवरामुलगा फरार झाल्याची बातमी तिच्या घरच्यांना समजली तेव्हा सारेच हैराण झाले. असं सांगितलं जातंय की मेलिनचे लग्न हिंदू पद्धतीने होणार होते. मात्र लग्नाच्या आधीच नवरामुलगा फरार झाला. मात्र तिच्या घरच्यांनी तिचे लग्न धार्मिक कट्यारीशी लावून दिले आहे. यामुळे त्यांच्या घरची इज्जत वाचेल आणि त्या बाळाला वडिलांचे नावही मिळेल. मात्र नवरा मुलगा पळून गेल्याने मेलिना खूप दु:खात आहे. दरम्यान, मुलगा का आणि कुठे पळाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.