Shocking Story : लग्नापूर्वीच होणाऱ्या वधूने वराला गंडवलं, एअरपोर्टवरून सर्व सामानसह 4.8 लाख घेऊन झाली फरार

साखरपुडा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका दुर्देवी व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली.  लग्नासाठी रोमला जाणाऱ्या जोडप्यातील महिलेने पुरूषाला गडंवलं आणि विमानतळवरूनच फरार झाली.  

bride to be ditches fianc at airport takes off with all his luggage and rs 4 8 lakh in cash read in marathi
लग्नापूर्वीच होणाऱ्या वधूने वराला गंडवलं  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ती जोडी गाठ बांधण्यासाठी रोमला जात होती. दोघेही त्यांच्या चाळीशीचे आहेत , ते नुकतेच भेटले होते.
  • पण इटलीला जाण्यासाठी हिथ्रो येथे विमानाने जात असताना, वर शौचालयात गेल्यावर त्याच्या होणाऱ्या बायकोने सर्व सामानासह अचानक पोबारा केला.
  • फसवलेल्या गेल्या व्यक्तीने पोलिसांना कॉल केला. त्याचे सामान आणि महिला 5 हजार पौंड घेऊन फरार झाल्याचे कळवले. 

लंडन :  एका व्यक्तीला लग्नापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. तो अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. लग्नासाठी रोमला जाणाऱ्या व्यक्तींचा एक दिवसापूर्वी साखरपुडा झाला होता. तो आणि त्याची होणारी साथीदार लंडनच्या हिथ्रो विमानतळावर आले. पण वर बाथरूमला गेला तेवढ्यात वधूने संधी साधली आणि तिने तेथून गायब झाली.  तीने त्या व्यक्तीचे सर्व सामान आणि 5 हजार पौंड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे.  ही महिला विमानात चढली की विमानतळावरून गायब झाली हे अद्याप समजू शकले नाही. (bride to be ditches fianc at airport takes off with all his luggage and rs 4 8 lakh in cash read in marathi)

अधिक वाचा :  रिअल लाइफमध्ये खूप ग्लॅमरस आहे भाग्य दिले तू मलाची कावेरी


दोघे जण इटलीला लग्नासाठी जात होते. त्यावेळी ही घटना घडली.  वर शौचालयात गेल्यावर तिच्या मंगेतराच्या सर्व सामानासह अचानक गायब झाली. धक्का बसलेल्या व्यक्तीने पोलिसांना कॉल केला आणि घडलेली हकिकत सांगितली.  या महिलेने सर्व सामान आणि 5 हजार पौंड घेऊन पोबारा केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हीथ्रो विमानतळाच्या टर्मिनल 5 मध्ये ही घटना घडली.

अधिक वाचा :  प्राजक्ता माळीकडून फॅशन डिझायनरला मारहाण खरं की खोटं

"त्याने एक दिवस आधी प्रपोज केले होते आणि तिने ते मान्य केले होते. त्यांनी रोममध्ये लग्न करण्याची योजना आखली होती आणि ते तिथेच उड्डाण करणार होते.  हिथ्रो विमानतळावर तो व्यक्ती बाथरूमला गेला. त्याच वेळी तिने धावपळ केली आणि त्यांच्या सर्व सामानासह गायब झाली," असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

अधिक वाचा :  कियारा आडवाणीचा लूक, मलायका अन् जान्हवीलाही विसराल

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पोलिसांकडून तपास सुरू आहे परंतु प्रश्न हाच आहे की महिला विमानतळातून बाहेर पडली की चोरीच्या पैशांसह फ्लाइटमध्ये चढली हे अद्याप ते ठरवू शकलेले नाहीत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी