VIDEO: लग्नाच्या मंडपात नवऱ्यासोबत बसलेल्या नवरीने केले असे इशारे की व्हायरल झाला व्हिडिओ

व्हायरल झालं जी
Updated Jun 07, 2021 | 15:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठचा आहे याची माहीत नाही. व्हिडिओमध्ये नवरीमुलगी असे काही इशारे करत आहे. 

dulhan
VIDEO:नवरीचा इशारा तुम्हाला दिसला ना.... 

थोडं पण कामाचं

  • सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका मंडपात नवरीमुलगी बसलेली दिसत आहे
  • नवरीच्या या वेगळ्याच हरकती पाहून लोक हा व्हिडिओ पाहत आहेत. 
  • व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. 

मुंबई: सोशल मीडियावर(social media) दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल(viral video) होत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ एका लग्न मंडपातील(marriage hall) आहे. साधारणपणे लग्नात नवरी मुलगी मान खाली घालून बसलेली असते आणि लग्नाचे विधी पूर्ण करत असते. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो थोडा हटके आहेत. यातील नवरी ही बिनधास्त आहे आणि लग्नात मस्ती करताना दिसत आहे.(Bride video viral on social media)

व्हायरल झाला व्हिडिओ

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्हिडिओत नवरा-नवरी बसलेले आहेत आणि लग्नाचे विधी सुरू आहेत. यातच नवरीचे लक्ष कॅमेऱ्याकडे जाते. ते पाहताच नवरी मुलगी कॅमेऱ्याकडे पाहून मस्ती करू लागते. विविध पोझ द्यायला सुरूवात केले. त्यानंतर नवरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

व्हिडिओमध्ये दिसतेय की लग्न मंडपात बसलेली नवरी कॅमेऱ्यामनला वेगवेगले एक्सप्रेशन देताना दिसत आहेत. ती सगळ्या प्रकारच्या पोझ देत फोटो काढतेय. या दरम्यान ती कधी डोळे मिचकावते तर कधी पाऊन बनवत विक्टरी साईन बनवते. नवरा आणि नवरी पाहून हा व्हिडिओ नेपाळचा असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने हा व्हिडिओ पाहिला गेला आहे तर २ हजाराहून अधिक याला लाईक्स मिळाले आहेत. 

नवरीला पाहून अनेकजण तिच्या बिंदास स्वभावाचे कौतुक करत आहेत तर काही जण आपले हसू रोखू शकत नाहीत. एका युझरने लिहिले की मस्ती करण्याचा हक्क फक्त मुलांना आहे का? नवरीने जे केले ते योग्य होते कारण तिलाही आपले लग्न एन्जॉय करण्याचा हक्क आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी