Viral Video : मेकअप करुन घेताना नववधू झोपली आणि नंतर...

bride went to the beauty parlor and took a sleep there : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणारी नववधू पण लग्नासाठीची तयारी म्हणून लवकर मेकअपसाठी आली होती....

bride went to the beauty parlor and took a sleep there, Viral Video
मेकअप करुन घेताना नववधू झोपली आणि नंतर...  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : मेकअप करुन घेताना नववधू झोपली आणि नंतर...
  • सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल
  • व्हिडीओवर प्रतिक्रिया येत आहेत

bride went to the beauty parlor and took a sleep there : लग्न म्हटलं की नववधूचा मेकअप आलाच. लग्नासाठी नववधूला लवकर तयारी सुरू करावी लागते.... सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणारी नववधू पण लग्नासाठीची तयारी म्हणून लवकर मेकअपसाठी आली होती. मेकअप करणारी व्यक्ती तिच्या कामात मग्न होती. मेकअपला वेळ लागणार आणि तोपर्यंत स्थिर बसून राहावे लागणार हे माहिती असल्यामुळे नववधू डोळे मिटून खुर्चीवर निवांत बसली होती. नकळत नववधूचा डोळा लागला. नववधू झोपली असल्याचे मेकअप करणाऱ्या व्यक्तीला लक्षात आले आणि तिने गंमत म्हणून झोपलेल्या नववधूचा व्हिडीओ तयार केला. 

व्हिडीओत मेकअपसाठी खुर्चीवर बसलेल्या नववधूला झोप लागल्याचे दिसत आहे. नववधू खुर्चीत बसल्या बसल्या शांत झोपल्याचे दिसत आहे. बहुधा लग्नाच्या गडबडीत पुरेशी विश्रांती मिळाली नसल्यामुळे नववधूला मेकअप करून घेताना नकळत झोप लागली. 

झोपेत नववधूचे तोंड किंचित उघडे राहिले आहे. पण गाढ झोपेत असलेल्या नववधूला त्याची चिंता दिसत नाही. ती निवांत झोपली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी