ichthyosaur : इंग्लंडमध्ये सागरी ड्रॅगनचे १८०० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म

Britain's largest ever ichthyosaur is discovered in Rutland Water : सागरी ड्रॅगन अर्थात इचथियोसॉरचे १८०० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले. इंग्लंडमधील संशोधकांना हे जीवाश्म सापडले. सापडलेले जीवाश्म हे इंग्लंडमधील इचथियोसॉरचे सर्वात मोठे आणि सर्वात जुने जीवाश्म आहे. 

Britain's largest ever ichthyosaur is discovered in Rutland Water
इंग्लंडमध्ये सागरी ड्रॅगनचे १८०० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडमध्ये सागरी ड्रॅगनचे १८०० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म
  • इंग्लंडमधील इचथियोसॉरचे सर्वात मोठे आणि सर्वात जुने जीवाश्म
  • सुमारे ९०० लाख वर्षांपूर्वी इचथियोसॉर नामशेष झाले

Britain's largest ever ichthyosaur is discovered in Rutland Water : लंडन : सागरी ड्रॅगन अर्थात इचथियोसॉरचे १८०० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले. इंग्लंडमधील संशोधकांना हे जीवाश्म सापडले. सापडलेले जीवाश्म हे इंग्लंडमधील इचथियोसॉरचे सर्वात मोठे आणि सर्वात जुने जीवाश्म आहे. 

इचथियोसॉरच्या शरीराचा आकार साधारण आता अस्तित्वात असलेल्या डॉल्फिन माशासारखा होता. सुमारे ९०० लाख वर्षांपूर्वी इचथियोसॉर नामशेष झाले. 

रुटलँड काउंटीमधील जलाशयात सापडलेला इचथियोसॉरचा सांगाडा सुमारे दहा मीटर लांबीचा आहे. या प्राण्यांचे दात आणि डोळे अतिशय मोठे होते यामुळेच त्यांना सागरी ड्रॅगन या नावाने ओळखले जाते.

इचथियोसॉरचा पहिला जीवाश्म १९व्या शतकाच्या सुरुवातीला जीवाश्म संशोधक आणि जीवाश्मशास्त्रज्ञ मेरी ऑनिंग यांनी लावला. ताजे जीवाश्म हे रुटलँड काउंटीमधील जलाशयात सापडले. लीसेस्टरशायर आणि रटलँड वाइल्डलाइफ ट्रस्टच्या एका संवर्धन टीमचे लीडर जो डेव्हिस यांना आधी जलाशयाच्या चिखलात कशेरुकाचे काही भाग दिसले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले. या उत्खननादरम्यान इचथियोसॉरचे सुमारे दहा मीटर लांबीचे जीवाश्म सापडले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी