Virginity: 'व्हर्जिनिटी रिपेअर'द्वारे पुन्हा व्हर्जिन बनत आहे तरूणी, इतकी फी घेताहेत डॉक्टर 

Virginity Repair: लंडनमधील महिलांना व्हर्जनिटी पुन्हा परत देण्याचा दावा करणाऱ्या क्लिनक आणि डॉक्टराबाबत एक धक्कादायक बतमी समोर आली आहे. 

british doctors and clinics accused cashing secret virginity repair surgery Crime news in marathi
Virginity: 'व्हर्जिनिटी रिपेअर'द्वारे पुन्हा व्हर्जिन बनत आहे तरूणी, इतकी फी घेताहेत डॉक्टर   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • लंडनच्या डॉक्टरांचा प्रताप, महिलांना फूस लावून करताहेत सर्जरी
  • लग्नाच्या पहिल्या रात्री व्हर्जिनिटी सिद्ध करण्यासाठी तरूणी करताहेत ऑपरेशन
  • मुस्लिम महिलांच्या गैरसमजाचा फायदा घेतल डॉक्टर उकळताहेत पैसे

लंडन :  महिलांना व्हर्जिनिटी पुन्हा परत देण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टर आणि क्लिनिकचा खुलासा झाला आहे. बातमीनुसार हे क्लिनिक विशेष करून मुस्लिम महिलांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. त्यांना लग्नासाठी परफेक्ट पद्धतीने तयार करण्यासाठी व्हर्जिनिटी पर देण्याचा दावा हे डॉक्टर करत आहे. त्यांच्या जाळ्यात अनेक महिला आल्या आहेत. तसेच यासाठी डॉक्टराने ऑपरेशन करून मोठी रक्कमही उकळली असल्याचे समोर आले आहे. 

एका बातमीनुसार ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येत डॉक्टर महिलांना 'व्हर्जिनिटी रिपेअर' ऑपरेशनचे आमिष दाखवून पैशे छापत आहेत. आरोप लावण्यात आला आहे की, विशेष करून ट्रेडिशनल कुटुंब म्हणजे रुढीवादी कुटुंबाशी संबंधीत महिलांना हे डॉक्टर आपले टार्गेट बनवत आहेत. 

बातमीनुसार समोर आले की आतापर्यंत १०० पेक्षा अधिक महिलांना या ऑपरेशनसाठी तयार करण्यात आले आहे. त्यांना लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भ्रमित करण्यात आले होते. तसेच इमोशनली ब्लॅकमेल करण्यात आले होते. त्यांना सांगण्यात येत होते की व्हर्जिनिटी परत मिळविल्यावर त्यांना लग्नाच्या पहिल्या रात्री कोणताही समस्या होणार नाही. तसेच त्यांचा अनुभव आणखी चांगला होईल. 

या प्रक्रियेत डॉक्टर सुमारे एक तासात महिलेवर ऑपरेशन करून आपले उद्दिष्ठ पूर्ण करत असतं. ब्रिटिश संडे टाइम्सच्या बातमीनुसार एकट्या लंडनमध्ये असे २२ क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. काही प्रायव्हेट क्लिनिक एखाद्या महिलेकडून या ऑपरेशनसाठी सुमारे ३००० पाऊंड म्हणजे साधारण २-३ लाख वसूल करत होते. 

यात डॉक्टर दावा करत होते की ऑपरेशननंतर महिला पूर्वी सारख्या पवित्र होऊन जाती. हे ऑपरेशन त्यांच्या शरिरासाठी सुरक्षित आहे. एका गायनेक्लॉजी क्लिनिकच्या डायरेक्टरने सांगितले की, यात विशेष करून मुस्लिम महिलांच्या समजाचा फायदा उचलला जातो. त्यांच्यानुसार त्या महिलांचा समज असतो की व्हर्जनिटी गमावल्यावर त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री  शारिरीक संबंध ठेवले तर त्या रात्री  ब्लीड नाही केले तर गैरसमज निर्माण होतील. 

ब्रिटनमध्ये व्हिर्जिनिटी रिपेअर सर्जरी कायदेशीररित्या वैध आहे. पण महिलांना फूस लावून अशा प्रकारे फायदा उचलण्याचा प्रकार पहिल्यांदा समोर आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी