Viral Video : छतावरून कोसळला तरुण, भावाने ‘कॅच’ करत वाचवला जीव

आपला भाऊ छतावरून खाली कोसळत असल्याचं पाहून खाली उभा असलेला तरुण त्याच्या मदतीला धावला. जमिनीवर कोसळण्यापूर्वीच त्याने पकडल्यामुळे भावाचा जीव वाचला.

Viral Video
छतावरून कोसळला तरुण, भावाने ‘कॅच’ करत वाचवला जीव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • छतावरून कोसळला तरुण
  • भावाने जमिनीवर आपटण्यापूर्वी पकडले
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video : नजर हटी, दुर्घटना घटी हे वाक्य आपण रस्त्याने प्रवास करताना अनेकदा वाचतो. मात्र हे वाक्य केवळ रस्त्यावर ड्रायव्हिंग करतानाच नव्हे, तर आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर महत्त्वपूर्ण असतं, याचा प्रत्यय नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आला. छतावर (Terrese) उभं राहिलेला एक तरुण अचानक वरून खाली कोसळला (Collapsed), मात्र खाली उभ्या असणाऱ्या त्याच्या भावाने (Brother) वेळीच हालचाल केल्यामुळे त्याचा जीव वाचला. अनेकदा काही घटना या काही क्षणांच्या फरकाने घडत असतात. काही जीव वाचल्याच्या घटनांमध्ये तर टायमिंगलाच फार महत्त्व असतं. एखाद्या क्षणाचा उशीर झाला तरीसुद्धा होत्याचं नव्हतं होईल, अशा कित्येक घटना आजूबाजूला आपण पाहत असतो. अशीच हीसुद्धा एक घटना.

भाऊ छतावरून कोसळला

या व्हिडिओत एक तरुण झाडांना पाणी घालत असल्याचं दिसतं. आपल्या धुंदीत तो झाडांना पाईपने पाणी घालण्याचा आनंद घेत असतो. तेवढ्यात त्याची नजर छताकडे जाते. छतावर त्याचा भाऊ असतो. तो छताच्या इतक्या टोकावर येतो, की तो कोसळणार हे खाली उभ्या असलेल्या त्याच्या भावाला समजतंं. तो हातातील पाईप फेकून देतो आणि त्याच्याकडे धाव घेतो. आपल्याच वयाच्या आणि वजनाच्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी तो स्वतःचा जीव धोक्यात घालतो. एखादा चेंडू पकडावा त्याप्रमाणे तो भावाला पकडतो आणि त्याचं शरीर जमिनीवर आपटण्यापासून त्याला वाचवतो. 

वाचला भावाचा जीव

 छतावरून खाली कोसळणारा तरुण जर थेट जमिनीवर पडला असता, तर त्याचा जीव जाण्याची शक्यता होती. त्याने कितीही सावधपणा दाखवला असता तरी त्याला अनेक जखमा तरी नक्कीच झाल्या असत्या. मात्र त्याच्या भावाने आपला जीव धोक्यात घालत त्याला जमिनीवर पडूच दिले नाही. त्याला अलगद हवेतच झेललं आणि स्वतः खाली पडला. त्यामुळे भावाचा जीव वाचल्याचं या व्हिडिओत दिसतं. 

अधिक वाचा - JOB: 'या' कामासाठी मिळणार प्रत्येक महिन्याला 6.5 लाख पगार

व्हिडिओ होतोय व्हायरल

एका भावाने दुसऱ्या भावाला कसं वाचवलं, हे दाखवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना घडली त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत हा प्रसंग कैद झाला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. 

अधिक वाचा - Viral Video: धावत्या कारमधून चिमुकली रस्त्यावर पडली आणि मग..., अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

लोकांनी केलं भावाचं कौतुक

आपल्या भावासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणाचं सध्या लोक जोरदार कौतुक करत आहेत. कुणालाही मदत करण्याऐवजी फक्त बघत बसण्याची आणि मोबाईलमध्ये ती घटना रेकॉर्ड करण्याची लोकांची वृत्ती वाढत असताना ही घटना वेगळा आदर्श निर्माण करणारी आहे. आपल्याला एखाद्याचा जीव धोक्यात असल्याचं लक्षात आल्यावर कुठलाही विचार न करता त्याच्या मदतीसाठी सरसावलेल्या या तरुणाचा व्हिडिओ मूळ मानवी स्वभावाची प्रचिती देणारा असल्याचीही जोरदार चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी