World record: बिअरसाठी पबमध्ये जाण्याचाही झाला जागतिक विक्रम

व्हायरल झालं जी
Updated Apr 22, 2019 | 19:43 IST | टाइम्स नाऊ हिंदी

World record: ब्रूस मास्टर यांनी आजवर ५० हजार पबला भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे. यापुढेही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

Bruce Master
पन्नास हजार पबना भेटी देणारे ब्रुस मास्टर   |  फोटो सौजन्य: Facebook

नवी दिल्ली : पाश्चिमात्य देशांमध्ये कोणत्या गोष्टीचं रेकॉर्ड होईल सांगता येत नाही. आपल्याकडं ‘दारूच्या दुकानाची पायरी चढू नको’ असा उपदेशवजा सल्ला दिला जातो. पण इंग्लंडमध्ये एका महाशयांनी एक दोन नव्हे तर, ५० हजार पबमध्ये पाऊल टाकलंय. विशेष म्हणजे गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या महाशयांचं वय ७४ वर्ष आहे.

वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवणारा आहे. ब्रूस मास्टर नामक ही व्यक्ती इंग्लंडमध्ये राहते. आता त्यांनी केलेला विक्रम तोडणे जवळपास अशक्य आहे. ब्रूस यांनी ५० हजारहून अधिक पबमध्ये जाण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी आपल्या तारुण्याचे रहस्य बिअर असल्याचे सांगितले आहे. ब्रूस वयाच्या १५व्या वर्षी पहिल्यांदा पबमध्ये गेले होते. गेल्या ५० वर्षांत त्यांनी १ लाख २० हजार पाऊंड केवळ अल्कोहलवर खर्च केले आहेत. आता उतारवयात त्यांना त्यांच्या मुली बिअर पिण्यापासून थांबवत आहेत. पण, ब्रूस त्यातूनही वर्षभरात हजारो पबमध्ये आपली हजेरी लावून येतात.

ब्रूस यांनी लैडबाइबल या वेबसाइटला विशेष मुलाखत दिली आहे. त्यात ब्रूस म्हणाले, ‘जेव्हा मी लोकांना विचारतो की, माझे वय किती आहे, असे तुम्हाला वाटते? तेव्हा लोक १४ वर्षे असं उत्तर देतात. हा कदाचित बिअरचाच परिणाम आहे. मी १०० वर्षांचे आयुष्य जगणार आहे. माहिती नाही तोपर्यंत मी किती पबमध्ये जाऊन येईन.’ मला आशा आहे की मी कधी थांबू नये. माझ्या वयाचे लोक एवढे फिरू शकत नाहीत. पण मी जेव्हा बाहेर असतो तेव्हा खूप चालतो. त्यामुळे मी खूप अॅक्टिव्ह राहतो. माझ्या मुली आता मला कमी प्यायला सांगतात. पण, मला असेच चालत रहावे, असे वाटते.'

बिअरचा त्यांचा पहिला अनुभव

ब्रूस यांनी १९६०मध्ये पहिल्यांदा पबमध्ये गेल्याचे सांगितले आहे. त्यावेळी ते लंडनमध्ये जॉब करत होते. त्यानंतर त्यांना अशी हळू हळू सवय लागत गेली. पहिल्यांदा बिअर पिण्याचा अनुभव सांगताना ब्रूस म्हणाले, ‘मी पहिल्यांदा बिअर प्यायलो, तेव्हा मी १६ वर्षांचा देखील नव्हतो. पण, त्याचवेळी मला बिअर खूप आवडली होती. मला आठवतंय माझा पहिला घोट वडिलांच्या ग्लासमधीलच होता. पण, मी पब मोजायला १९७१ मध्ये प्रत्यक्षात सुरुवात केली. मला १९६०नंतरचे सगळे आठवते आहे. १९९४पर्यंत ब्रूस यांनी २७ हजार ६९५ पब ना भेटी दिल्या होत्या. त्याचवेळी त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद झाले होते. आता त्यांच्या पबची संख्या ५० हजारच्याही पुढे गेली आहे.

दरम्यान, कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल शरिरात घेणे हे हानीकारक आहे. अनेक आजारांमध्ये डॉक्टर अल्कोहोल किंवा बिअरचा घेण्याचा सल्ला देतात. पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये मद्य किंवा अल्कोहल घेणे हा तेथील संस्कृतीचा खाद्य संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे तेथे अशा प्रकारे विक्रम होताना दिसतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World record: बिअरसाठी पबमध्ये जाण्याचाही झाला जागतिक विक्रम Description: World record: ब्रूस मास्टर यांनी आजवर ५० हजार पबला भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे. यापुढेही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
Loading...
Loading...
Loading...